हैदर शेख, प्रतिनिधी
चंद्रपूर, 27 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. मंगेश जक्कुलवार मूळ चंद्रपूर शहरातील रहिवासी असून ते राजुरा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अर्थात 26 जानेवारी रोजी रात्री उशिरा कर्तृव्यावर रुजू झाला. ड्युटी पूर्ण झाल्यानंतर मंगेश सकाळी परत घरी गेला. यानंतर काही वेळाने त्याचा मृतदेह राजुरा ते बल्लारपूर या शहरादरम्यानच्या रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली निर्जन शेतशिवारात आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच मंगेश यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलीस दलातही खळबळ उडाली.पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची नाकेबंदी करत घटनेबाबत अधिक तपास सुरू केला. मंगेश यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलीस दलातही खळबळ उडाली.
घटनास्थळीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले असून मंगेशने अचानक इतक्या टोकाचा निर्णय का घेतला याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत.
मंगेश हे पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात कार्यरत होता. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण काय? त्याच्या अंगावरील कपड्यांमध्ये एखादी सुसाइड नोट सापडली का? याविषयी देखील पोलीस मौन बाळगून आहेत. दरम्यान, ही घटना आणि आत्महत्येमागचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी वेगवान तपास चालवला आहे.
ज्या हाताने लाड केले त्याच हाताने भाच्याला संपवलं, 4 वर्षाच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या
दरम्यान, चंद्रपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मामा आणि भाच्याचं नातं हे प्रेम आणि आपुलकीचं नातं समजलं जातं. या नात्याला एका नराधमाने कलंक लावलाय. शहरालगत दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 4 वर्षीय चिमुरड्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली. दिक्षांत कावडे असं त्याचं नाव आहे. वरवट या गावी घराच्या अंगणात दिक्षांत खेळत होता. त्याच्या नात्यातील मामाने अवजड काठीने डोक्यावर प्रहार करत त्याची हत्या केली. रंगनाथ गेडाम असं त्या हल्लेखोर मामाचं नाव आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपी रंगनाथ गेडाम(40) याला पकडून बांधलं आणि त्याची धुलाई केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत आरोपीला घेतलंय. मुलाचे शव जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आलंय. मात्र हत्येचं नेमकं कारण काय होतं याचा अजुनही उलगडा झालेला नाही.
मामा हा मनोरुग्ण असल्याची माहिती मिळतेय. दिक्षांत खेळत असताना रंगनाथ तिथे आला आणि त्याने काठीने जोरात त्याच्या डोक्यात मारलं आणि तो जागेवरच ठार झाला.