किल्ले शिवनेरीवर बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ

किल्ले शिवनेरीवर बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ

किल्ल्यावरील कडेलोटाच्या पश्चिमेच्या बाजूस आज दुपारी एक बेवारस मृतदेह निदर्शनास आला.

  • Share this:

जुन्नर, 4 मार्च : किल्ले शिवनेरीवर पुन्हा एकदा बेवारस मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. किल्ल्यावरील कडेलोटाच्या पश्चिमेच्या बाजूस आज दुपारी एक बेवारस मृतदेह निदर्शनास आला. त्यानंतर हा मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

अत्यंत जिकिरीचा असणाऱ्या या वाटेत हा मृतदेह काढताना वनरक्षक रमेश खरमाळे वनपाल शशिकांत मडके, वनरक्षक नारायण राठोड, किरण बाणखेले आणि विवेक पिंगळे यांना कसरत करावी लागली. निसरडी वाट असल्याने या वाटेतून मृतदेह काढत असताना अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले.

हा मृतदेह तीस ते पस्तीस वर्षांच्या युवकाचा असून चार ते पाच दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असावा असे सांगण्यात येते. शिवजयंतीनंतर 4 दिवसांनी पाण्याच्या टाकीत एक मृतदेह सापडला होता. त्यानंतर आज किल्यावर दुसरा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- मुंबईमध्ये धडकला कोरोना व्हायरस? 3 संशयित रुग्ण आढळले

शिवजयंतीनंतरही सापडला होता मृतदेह

किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनंतर 4 दिवसांनीही एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. शिवाई देवीच्या जवळ असलेल्या पाण्याच्या टाकीत हा मृतदेह सापडला. शिवजयंतीच्या दिवशी हा तरूण पाण्याच्या टाकीत पडल्याचा अंदाज बांधण्यात येत होता.

First published: March 4, 2020, 11:51 PM IST

ताज्या बातम्या