धक्कादायक! मुंबईत एका आठवड्यात चौथ्यांदा बॅगेत आढळला मृतदेह

धक्कादायक! मुंबईत एका आठवड्यात चौथ्यांदा बॅगेत आढळला मृतदेह

पनवेल तालुक्यात हरिग्राम ते पनवेल मार्गावर गाढी नदीच्या किनाऱ्यावर एका बॅगमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 10 डिसेंबर : बॅगमध्ये मृतदेह सापडण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहे. आता पनवेल तालुक्यात आणखी एक मृतदेह बॅगमध्ये आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हरिग्राम ते पनवेल मार्गावर गाढी नदीच्या किनाऱ्यावर एका बॅगमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. रेग्झिनच्या बॅगमध्ये असलेला हा मृतदेह कुजलेला असून त्याचा खून केल्यानंतर तो या ठिकाणी टाकून दिल्याचा अंदाज व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हरिग्राम परिसरातील तरुणांना सोमवारी सायंकाळी नदी पात्राच्या काठावर रेग्झिन बॅगेतून माणसाचा हात बाहेर आल्याचं दिसलं. त्यानंतर पोलिसांना याची माहिती कळवण्यात आली. पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा केलेल्या तपासणीमध्ये रेग्झिनच्या बॅगेत 30 ते 35 वयोगटातील व्यक्तीचा पुर्णपणे कुजलेला मृतदेह आढळून आला. या व्यक्तीने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.

दरम्यान, हत्या करून पुरावा नष्ट कऱण्यासाठी मृतदेह रेग्झिन बॅगेत घालून तो या ठिकाणी टाकला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मृताची ओळख अद्याप पटली नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

दोन दिवसांआधी कल्याण स्टेशन परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. एका बॅगेमध्ये महिलेचा मृतदेह ठेवण्यात आला होता. सगळ्यात गंभीर म्हणजे मृतदेहाचे शिर आणि धड गायब असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. बॅग ठेवुन जाणारा आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्याआधी माहिममध्येही असाच प्रकार घडला होता.

First published: December 10, 2019, 8:48 AM IST
Tags: crime

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading