अजितदादांच्या प्रकृतीबद्दल पार्थ पवारांनी दिली माहिती, 'त्या' वृत्ताचे केले खंडन

अजितदादांच्या प्रकृतीबद्दल पार्थ पवारांनी दिली माहिती, 'त्या' वृत्ताचे केले खंडन

कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे खबरदारी म्हणून अजितदादांनी स्वत: होम क्वारंटाउन होण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर :  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरली आहे. खुद्द अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. ताप आणि अंगदुखीच्या त्रासामुळे अजित पवार हे क्वारंटाइन आहे.

अजित पवार यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त पसरले आहे. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून ते स्वत: क्वारंटाइनमध्ये राहत आहेत, अशी माहिती पार्थ पवार यांनी दिली.

अंगदुखी आणि ताप आल्यामुळे अजित पवार यांना दोन दिवसांपासून बरे वाटत नव्हते.  त्यामुळे अजित पवार यांची तातडीने कोरोनाची चाचणीही करण्यात आली. मात्र, कोरोनाचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे.  पण थोडी ताप थंडी सारखी लक्षणे असल्याने अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रम थांबाविले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

कोरोनाच्या परिस्थितीत अजित पवार यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला होता. ज्या ठिकाणी अजित पवार जात होते, त्यावेळी ते स्वत: आपल्यासोबत सेनिटायझर बाळगत होते.  इतरांनीही ते खबरदारी घेण्याचा सल्ला देत होते.

दोन दिवसांपासून अजित पवार यांना अचानक ताप आणि थंडी भरून आली. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे खबरदारी म्हणून अजितदादांनी स्वत: होम क्वारंटाउन होण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना सारखी काही लक्षणे आढळत असल्याने अजित पवार हे पुढील काही दिवस क्वारंटाइन राहणार आहे. ताप आणि थंडी जाणवू लागल्यामुळे अजितदादांनी आपले सर्व कार्यक्रम हे रद्द केले आहे.

बुधवारी मंत्रालयात सुद्धा अजितदादा अनुपस्थितीत होते. तर आजचा राष्ट्रवादी कार्यालयातील जनता दरबार ही पवारांनी रद्द केला.

Published by: sachin Salve
First published: October 22, 2020, 1:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या