नागपूर पालिकाला मिळाले भाजपचे नवे महापौर, काँग्रेसच्या उमेदवाराचा केला पराभव

नागपूर पालिकाला मिळाले भाजपचे नवे महापौर, काँग्रेसच्या उमेदवाराचा केला पराभव

भाजपचे नगरसेवक दयाशंकर तिवारी हे विजयी झाले आहे. तिवारी यांना 107 मते मिळाली.

  • Share this:

नागपूर, 05 जानेवारी : नागपूर शहराला अखेर नवी महापौर (nagpur mayor election)मिळाला आहे. नागपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या (nagpur municipal corporation) निवडणुकीत भाजपने आपला गड कायम राखला आहे. महापौरपदी भाजपचे नगरसेवक दयाशंकर तिवारी (Dayashankar Tiwari ) यांची निवड झाली आहे.

नागपूर महानगर पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक दयाशंकर तिवारी हे विजयी झाले आहे. दयाशंकर तिवारी यांना 107 म्हणजेच पूर्ण मते मिळाली. त्याच्या विरोधात काँग्रेसच्या आमदार विकास ठाकरे यांच्या गटाचे रमेश पुणेकर यांना 27 मते तर बसपाचे नरेंद्र वालदे यांना 10 मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला आहे.

नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी यांनी निवडणूक प्रक्रिया दोन तासात हिट असतांना ऑनलाईन घेत दिवसभर रेंगाळत ठेवली, अशी नाराजी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, पदवीधर विधान परिषद निवडणुकीत माजी महापौर संदीप जोशी यांनी नशीब आजमावून पाहिले होते. पण, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारत संदीप जोशी यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला होता. संदीप जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर आज महापौरपदाची ऑनलाइन निवडणूक पार पडली.

 ऑनलाईन पद्धतीने पार पडली निवडणूक

नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उर्वरित कालावधीसाठी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक सकाळी ११.०० वाजता सुरू झाली. मनपा मुख्यालयातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही निवडणूक घेण्यात आली. विद्यमान महापौर संदीप जोशी व उपमहापौर मनीषा कोठे यांनी त्यांचे पदाचा राजीनामा दिल्यामुळे उर्वरित काळासाठी महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली.

भारतीय जनता पार्टीकडून महापौर पदासाठी नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी नामनिर्देशन केले होते. तर उपमहापौरपदासाठी पक्षाकडून नगरसेविका मनीषा  धावडे यांना संधी देण्यात आली. पुढील 13 महीने तिवारी यांना महापौरपद सांभाळावे लागणार आहे.

Published by: sachin Salve
First published: January 5, 2021, 3:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading