आता एका क्लिकवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपूर्ण कुंडली अशी मिळणार ऑनलाइन

आता एका क्लिकवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपूर्ण कुंडली अशी मिळणार ऑनलाइन

आता केवळ एका क्लिकवरच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्यानं केलेल्या गुन्ह्यांची सर्व माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 9 ऑगस्ट : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कुठे आहे? काय करत आहे ? जिवंत आहे का? यासह असंख्य प्रश्नांची उत्तर अनुत्तरितच आहेत. पण आता केवळ एका क्लिकवरच दाऊद आणि त्यानं केलेल्या गुन्ह्यांची सर्व माहिती सहज उपलब्ध होणार आहे. दाऊद, त्याचं गुन्हेगारी साम्राज्य तसंच त्याच्यासारख्या अन्य मोठमोठ्या गँगस्टर्सची प्रत्येक माहिती आता ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police)एक यंत्रणा सुरू केली आहे. या यंत्रणेद्वारे कुठलाही आरोपी कोणत्याही देशात आणि शहरात असेल तर त्याची संपूर्ण कुंडली केवळ एक बटण दाबताच ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र पोलिसांनी गेल्या आठवड्यात 'ऑटोमेटेड मल्टिमॉडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन' सिस्टम सुरू केलं आहे. याद्वारे गुन्हेगारी विश्वातील छोट्यातील छोटी माहितीदेखील आता सहज उपलब्ध होणार आहे. ही यंत्रणेस 'अ‍ॅम्बिस' म्हणूनही ओळखली जात आहे.

महाराष्ट्र पोलिसांतील अधिकाऱ्यांनुसार, ही यंत्रणा लवकरच नॅशनल क्राइम ब्युरो आणि इंटरपोलला देखील जोडण्यात येणार आहे. संबंधित यंत्रणा सर्व तपास संस्थांशी जोडली गेल्यानंतर परदेशात पसार झालेला दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसारख्या अंडरवर्ल्ड डॉन तसंच दहशतवादासंदर्भात जोडली गेलेली प्रत्येक माहिती इंटरपोलला देखील पुरवली जाईल.

(वाचा : धक्कादायक! 6 वर्षांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या, नराधम मृतदेहाचे करत होते बारीक-बारीक तुकडे)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट

'अ‍ॅम्बिस' हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं जात आहे. या यंत्रणेवर सीआयडी आणि सायबर पोलीसचे आयजी बृजेश सिंह यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. मुंबईतील 94 पोलीस स्टेशनमध्ये ही यंत्रणा सध्या उपलब्ध आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील 1200 पोलीस स्टेशनमध्येही ही यंत्रणा जोडली जाईल.

(पाहा : आजीने प्राण सोडले पण नातवाला सोडलं नाही, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO)

'अ‍ॅम्बिस'मध्ये काय-काय असणार उपलब्ध?

प्रत्येक आरोपीच्या बोटांच्या ठशांसहीत त्यानं कोणकोणते गुन्हे केले आहेत, केव्हा-केव्हा कारागृहात त्याला डांबवलं गेलंय, यासह सर्व महत्त्वाची माहिती या यंत्रणेमध्ये उपलब्ध असणार आहे. 'ऑटोमेटेड मल्टिमॉडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन' यंत्रणेमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपीच्याही हाताचे पंजे, बोटांचे ठसे, डोळ्यांची बुबळे आणि चेहरा या माहितीचाही समावेश असणार आहे.

(पाहा :तुझ्यासाठी जीव झाला येडा पिसा! महिला पोलीस गँगस्टरच्या प्रेमात घायाळ, थाटलं लग्न)

VIDEO: 'खायला दिलं पण खायची इच्छा नाही, मला माझा प्रपंच पाहिजे'

Published by: Akshay Shitole
First published: August 9, 2019, 10:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading