दाऊदच्या साम्राज्याला बसणार मोठा हादरा, महाराष्ट्रातल्या या संपत्तीचा होणार लिलाव

दाऊदच्या साम्राज्याला बसणार मोठा हादरा, महाराष्ट्रातल्या या संपत्तीचा होणार लिलाव

दाऊदची मुंबईतली सर्व संपत्ती SAFEMAने जप्त केली आहे. त्यानंतर आता खेडच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे. लोकांनी ही संपत्ती घेण्यासाठी उत्सुकता दाखविल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  • Share this:

खेड 02 नोव्हेंबर: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या आर्थिक साम्राज्याला मोठा हादरा बसणार आहे. दाऊदची वडिलोपार्जित संपत्तीचा (Ancestral Land) लिलाव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याची सुरूवाही करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातलं खेड हे दाऊदचं मुळगाव आहे. इथे त्याची कोट्यवधींची संपत्ती आहे. स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स फॉरफीचर ऑफ प्रॉपर्टी अक्ट Smugglers and Foreign Exchange Manipulators Act (SAFEMA) च्या कायद्यानुसार हा लिलाव होणार आहे. त्याच्या 7 मालमत्तांची लिलाव 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

दाऊदची मुंबईतली सर्व संपत्ती SAFEMAने जप्त केली आहे. त्यानंतर आता खेडच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे. लोकांनी ही संपत्ती घेण्यासाठी उत्सुकता दाखविल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.

SAFEMA चे अधिकारी सय्यद मुनाफ यांनी माहिती दिली की दाऊदच्या 17 मालमत्ता आहेत. कोरोनामुळे ई लिलाव होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील त्याच्या मुळगाव असलेल्या खेड तालुक्यातील मुंबके़ आणि खेड शहर तसंच तालुक्यातील लोटे येथील विविध मालमत्तांचा हा  लिलाव होत आहे.

या आहेत मालमत्ता

जमीन - राखीव किंमत

27 गुंठा - 2 लाख 5 हजार 800

29.30 गुंठा - 2 लाख 23 हजार 300

24.90 गुंठा - 1 लाख 89 हजार 800

20 गुंठा - 1 लाख 52 हजार 500

18 गुंठा - 1 लाख 38 हजार

30 गुंठा जमिनीवर असलेले घर - 6 कोटी 14 लाख 8 हजार 100

केंद्र सरकारने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कारवाई करताना 2018 साली त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्यास सुरूवात केली होता. त्यानुसार मुंबईतील मालमत्तेचा लिलाव पहिल्यांदा करण्यात आला होता. या लिलावात मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात आली होती. सुमारे 3.51 कोटी रुपयांस या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता.

सैफ बुरहानी अपल्फिमेंट ट्रस्टने या जागेसाठी सर्वाधिक बोली लावली होती. आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या 10 नोव्हेंबरला दाऊदच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील जवळपास 7 मालमत्तांचा लिलाव व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे करण्यात येणार आहे. रत्नागिरी येथील मुंबाके गावात ही मालमत्ता असून या ठिकाणी दाऊदच्या नावावर अनेक जमिनी आणि घर असल्याचे सांगण्यात आलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 2, 2020, 9:04 PM IST

ताज्या बातम्या