औरंगाबाद, 4 मे : माणुसकी शिल्लक राहिली नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद जवळील दौलताबादच्या घाटामध्ये अपघात झाला. या अपघातात जखमी झालेले दोन तरुण रस्त्यावर तडफडत होते. पण या जखमींना मदत करण्याचं सोडून लोक व्हिडिओ काढत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
दौलताबाद घाटातील शेळके मामा हॉटेलच्या जवळ हा अपघात झाला. त्या ठिकाणी काही महिला देखील होत्या. मला मदत करा, अशी याचना अपघातग्रस्त तरूण करत होता. पण त्याच्या मदतीला कोणीही आलं नाही. जवळपास एक ते दीड तास लोक त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढत होते.
कुणीही मदत न केल्याने अपघातात जखमी झालेल्या सुमित कवडे याचा मृत्यू झाला. लोकांनी मदत केली असती तर आज सुमित जिवंत राहिला असता. पण लोक मदतीऐवजी व्हिडिओ काढण्यात दंग होते.
दरम्यान, अपघातातील जखमीला मदत करण्याऐवजी त्याचा व्हिडिओ काढण्याचा हा काही पहिला प्रकार नाही. याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे ही असंवदेनशीलता नेमकी जाणार तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
SPECIAL REPORT: मोदींना शह देण्यासाठीची काँग्रेसची नवी खेळी उघड