• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मुलगी झाली म्हणून पतीनं पत्नीकडेच केली पैशाची डिमांड, आता पोलिसांत गेलं प्रकरण 

मुलगी झाली म्हणून पतीनं पत्नीकडेच केली पैशाची डिमांड, आता पोलिसांत गेलं प्रकरण 

समाजात अजूनही मुलगा-मुलगी असा भेद केला जात आहे. असंच एक प्रकरण भिवंडीत उघडकीस आलं आहे.

  • Share this:
भिवंडी, 6 डिसेंबर: समाजात अजूनही मुलगा-मुलगी असा भेद केला जात आहे. असंच एक प्रकरण भिवंडीत उघडकीस आलं आहे. मुलगी झाली म्हणून पतीनं आपल्या पत्नीकडेच मुलीच्या संगोपनासाठी 30 हजार रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीनं पैसे देण्यास नकार दिल्यामुळे पतीनं पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला. आता हे प्रकरण पोलिसांत गेलं आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलशाद गामा मोमीन, असं आरोपी पतीचं नाव आहे. तर दीर सोनू आणि नौशाद (रा. शांतीनगर, भिवंडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. हेही वाचा...पुण्यात जात पंचायतीनं महिलेला केलं बहिष्कृत; नीलम गोऱ्हेंनी केली 'ही' मागणी मिळालेली माहिती अशी की, पीडिताचं काही वर्षांपूर्वीच आरोपी दिलशान याच्याशी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. मार्च महिन्यात पीडितेला मुलगी झाली. त्यामुळे आरोपी पती यानं  20 मार्च ते 18 मे 2020 या दोन महिन्यांच्या काळात मुलगी झाली म्हणून तिच्या संगोपनासाठी पत्नीकडे 30 हजार रुपये दे, असा तगादा लावला होता. मात्र, पत्नीकडे पैसे नसल्यानं पतीला स्पष्ट नकार दिला. त्याचबरोबर माहेरची आर्थिक परिस्थिती देखील हालाखीची आहे. नंतर पतीसह दोन दीरांनी पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. अखेर या छळाला कंटाळून पीडितेन पती आणि तिच्या दोन दीरांविरुद्ध शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. मांत्रिकानं सांगितलं सूनेना होणार नाही मूलबाळ... दरम्यान, गेल्या आठवड्यात भिवंडीत अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. मांत्रिकानं सांगितलं तुली मूलबाळ होणार नाही, अस म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भिवंडी येथे हा घडला होता. सासरच्या लोकांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पीडितेवर उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सुरुवातीला टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो भिवंडी पडघा पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. सासारच्या लोकांविरोधात भादंवी कलम 498 (अ) मारहाण करणे, धमकवणे या कलमानुसार भिवंडी-पडघा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिताली पाटील असं मारहाण झालेल्या विवाहितेचं नाव आहे. सासरच्यांनी इतकी अमानुष मारहाण केली आहे की, तिच्या शरीरावर काळे निळे वळ उमटले आहेत. आपटी गावात राहणाऱ्या मितालीचं 15 जून 2020 रोजी भिवंडी देवरुंग पाडा इथे राहणाऱ्या देवेश पाटील याच्या सोबत लग्न झाले होते. मात्र, लग्नाच्या 15 दिवसानंतर लगेच पतीचे मामा, मामी आणि नवऱ्याने तिचा छळ सुरू केला. हेही वाचा...पुण्यात बर्थडे पार्टीत तिघांनी केली 'गंदी बात', महिलेसमोरच विवस्त्र अवस्थेत केला सासरच्यांना एका मांत्रिकानं सांगितलं की, मितालीला मूलबाळ होणार नाही. त्यानंतर सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केल्याचं मितालीनं सांगितलं. 24 नोव्हेंबर रोजी रात्री सासरच्या लोकांना एका चारचाकी गाडीत कोंबून बेदम मारहाण करत माहेरी आपटी या गावातील घरातील अंगणात टाकून दिलं, असंही मितालीनं पोलिसांना सांगितलं. इतका अमानुष छळ करणाऱ्या सगळ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मितालीनं केली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: