बीड, 21 जुलै : मुलीच्या विरहाने बापाने गळफास घेऊन आत्महत्या (Father suicide) केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील सिरसाळा (Sirsala Beed) येथे घडली आहे. शेख रतन शेख नुरमुहम्मद (Shaikh Ratan Shaikh Nurmuhammad) वय ४२ असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुलीचा तीन महिने उलटून ही शोध लागला नाही पोलीस उडवा उडवीची उत्तर देतात. पोलीस स्टेशनच्या गलथान कारभारामुळे वैतागुन रतन यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.
रतन यांच्या मृत्यूला पोलीस प्रशासन जबाबदार आहे, मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कार्यवाही करा अशी मागणी करत नातेवाईकांनी ठिय्या केला. 6 तासाच्या ठिय्या नंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला. यावेळी पळवून नेलेल्या मुलीचा तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी संतप्त नातेवाईकांनी केली.
कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश; आरोपी राणी पोलिसांच्या जाळ्यात
सिरसाळा येथील रतन शेख यांच्या मुलीस 8 एप्रिल रोजी अज्ञात आरोपीने पळवून नेले. या प्रकरणी सिरसाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जनक पुरी यांच्याकडे होता पंरतु त्यांची सेवानिवृत्त झाली. यामुळे हा तपास पोलीस उपनिरीक्षक अधिकारी महेश विघ्ने यांच्याकडे गेला. घटना घडल्या पासून मुलीचे वडील रतन शेख व नातेवाईक तपास कुठपर्यंत आला हे विचारण्यासाठी सतत पोलीस स्टेशनला जात असत. तीन महिने झाले तरी मुलीचा तपास न लागल्याने आणि मुलीच्या विरहाने तणावग्रस्त परिस्थितीत रतन शेख यांनी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकांनी तक्रारीत म्हटले आहे.
सिरसाळा काहीकाळ येथे तणाव निर्माण झाला होता. माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सिरसाळा पोलीस स्टेशन येथे तात्काळ आले आणि मयताचे नातेवाईक यांच्या भावना व मागणी समजून घेत पळवलेल्या मुली प्रकरणी तपास वेगात करण्यात येईल तोपर्यंत हा तपास सिरसाळा प्रभारी सह पोलीस निरिक्षक एकशिंगे यांच्याकडे सोपावला असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी दोषीवंर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल असं सुरेश पाटील म्हणाले. पाटील यांनी मयताच्या नातेवाईकांना समजावून सांगितल्याने जमाव निवळला. सायंकाळी मयत रतनचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.