नांदेड, 1 एप्रिल : आई आणि मुलीचे नाते फारच जवळचे असते. आई मुलीसाठी आणि मुलगी आईसाठी अगदी जीव ओवाळून टाकायला तयार असतात. भारतीय संस्कृतीमध्ये यासंदर्भातील उदाहरणे समाजजीवनात दिसत असतात. यातच नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वृध्द आईच्या मृत्यूची बातमी ऐकुन मुलीचेही प्राण सोडले. डोळ्यात पाणी आणणाऱ्या नांदेडमधील या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
गयाबाई शेवाळकर या 80 वर्षांच्या महिलेचे वृद्धाकाळाने निधन झाले. नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील तामसा येथे ही घटना घडली. मात्र, गयाबाई शेवाळकर यांच्या निधनाची वार्ता ऐकून शेजारील गावात राहणारी त्यांची 56 वर्षीय मुलगी जयमाला जाधव घरी आल्या. आईचा मृतदेह पाहून हंबरडा फोडत त्यांनी देखील यावेळी प्राण सोडले. एकाच दिवशी दोन मृत्यु झाल्याने शेवाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आईच्या मृत्यूच्या दु:खाने मुलीनेही प्राण त्यागल्याने यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
दारुड्या बापाने शिवीगाळ केली, 22 वर्षीय तरुणीला राग झाला अनावर, घेतला भयानक निर्णय
खेळता खेळता जीव गेला, 13 वर्षांच्या मुलासोबत वाईट घडलं
जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत अंगावर कोसळून एका 13 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.