मुंबई, 04 डिसेंबर: MPSC परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती (MPSC news 2021) समोर आली आहे. आज एमपीएससी आयोगाने पुढील वर्षी 2022 ला होणाऱ्या सर्व अंदाजित परीक्षांचे (MPSC Exam 2022) वेळापत्रक (MPSC Exam 2022 Time Table) जाहीर केल्यामुळे विध्यार्थ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांना पुढील अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे.
MPSC वर्षभरात वर्ग एक आणि दोन साठींच्या विविध संवर्गांसाठी साधारण 13 प्रकारच्या परीक्षा घेते. याचं अंदाजे वार्षिक वेळापञक upscच्या धर्तीवरच mpscने बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांचं जाहिर केलंय. परीक्षांच्या आधीच जाहीर झाल्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचं परीक्षार्थींनी स्वागत केलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/TSNOZ64woC
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 4, 2021
महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मार्च महिन्यापर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा 7,8 आणि 9 मे रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर होणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा भाग असलेली पूर्व परीक्षा 12 मार्च 2022 रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा 2 जुलै 2022 रोजी होईल तर निकाल ऑगस्टमध्ये जाहीर होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mpsc examination