Home /News /maharashtra /

बापरे! 400 ATM कार्डचा डेटा चोरला अन् कोट्यवधी रुपये केले गायब, ठाण्यातील घटना

बापरे! 400 ATM कार्डचा डेटा चोरला अन् कोट्यवधी रुपये केले गायब, ठाण्यातील घटना

 आरोपी हे खिशामध्ये स्किमर घेवून एटीएम सेंटरवर रक्कम काढण्यास आलेल्या नागरिकाचे एटीएम कार्ड पिन नंबर चोरून बघून

आरोपी हे खिशामध्ये स्किमर घेवून एटीएम सेंटरवर रक्कम काढण्यास आलेल्या नागरिकाचे एटीएम कार्ड पिन नंबर चोरून बघून

आरोपी हे खिशामध्ये स्किमर घेवून एटीएम सेंटरवर रक्कम काढण्यास आलेल्या नागरिकाचे एटीएम कार्ड पिन नंबर चोरून बघून...

    ठाणे, 25 डिसेंबर : एटीएममध्ये (atm) पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांचे पिन क्रमांक (pin card) चोरून पाहून त्यांना बोलण्यात गुंगवूत ठेवून हातचलाखीने एटीएम कार्डमध्ये (atm card) ठेवलेल्या स्किमरद्वारे डाटा चोरी करून खात्यावरील पैसे काढून घेण्याचा गोरख धंदा करणाऱ्या तीन जणांना डायगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  त्यांनी आतापर्यंत तब्बल 400 डेबिट कार्डचा डेटा चोरून कोट्यवधी रुपयाचा गंडा घातल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वंदना विजय गोरी या त्यांचा नातू नीरज याच्यासोबत 10 जुलै 2021 रोजी बँक ऑफ बडोदा दहीसर ठाणे या एटीएम सेंटरवर दहा हजार रुपयांची रक्कम काढण्याकरता आल्या होत्या.  दरम्यान त्याच वेळी एटीएममध्ये 3 अज्ञात इसमांनी शिरकाव केला. वृद्ध महिला वंदना गोरी यांचा नातू नीरज याला आरोपींनी बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच्याकडे असलेले एटीएम कार्ड हातचलाखीने काढून घेत, आरोपीने खिशामध्ये ठेवलेल्या स्किमरद्वारे एटीएम कार्डचा डेटा चोरी केला. त्यानंतर १३ जुलै २०२१ ते २४ सप्टेंबर २०२१ या दरम्यान तब्बल 73 हजार २०० रुपये बनावट एटीएम कार्ड द्वारे काढून या वृद्ध महिलेची फसवणूक करण्यात आली. सदर प्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हेही वाचा - IND vs SA : द्रविड सीनियर खेळाडूंना बाहेर करण्याच्या तयारीत, कोणाला बसणार धक्का? सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर डायघर पोलिसांना आरोपी शोधून जेरबंद करणे म्हणजे तारेवरची कसरत आणि एक आव्हानच होते. दरम्यान डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे आणि त्यांचे तपास पथक यांनी सदर फसवणूक प्रकरणी गंभीरतेने तपास करीत तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलीस पथकाने तीन आरोपीना बेडया ठोकल्या. यात आरोपी जमिल अहमद मोहम्मद दरगाही शेख, गोविंद हनुमंत सिंग,आशिष कुमार उदयराज सिंग या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात नेले असता त्यांना २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. पोलिस पथकांनी अटक आरोपींची कसून चौकशी केली. अशा प्रकारे ATM कार्डचा डेटा चोरायचे! आरोपी हे खिशामध्ये स्किमर घेवून एटीएम सेंटरवर रक्कम काढण्यास आलेल्या नागरिकाचे एटीएम कार्ड पिन नंबर चोरून बघून त्याला बोलण्यात गुंतवायचे आणि हातचलाखीने एटीएम खिशात ठेवलेल्या स्किमरद्वारे डेबिट कार्डचा डेटा चोरी करायचे.  तो डेटा दुसऱ्या कार्डवर पेस्ट करीत एटीएममधून पैसे काढण्याचा गोरख धंदा करीत असल्याचं समोर आले. हेही वाचा - या' लोकांना देणार कोरोना लशीचा बुस्टर डोस; पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय दरम्यान, या तिन्ही आरोपींनी आतापर्यंत जवळपास 400 डेबिट कार्डचा डेटा चोरून त्याद्वारे बनावट एटीएम कार्ड बनवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस पथक अधिक तपास करीत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: ATM, Thane

    पुढील बातम्या