मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'दुखावलेल्या बापाच्या पत्रा'वर ठाकरे गटाकडून आली पहिली रिअॅक्शन

'दुखावलेल्या बापाच्या पत्रा'वर ठाकरे गटाकडून आली पहिली रिअॅक्शन

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवावर केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. शिंदेंच्या नातवावर केलेल्या टीकेवर आता ठाकरे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 6 ऑक्टोबर : उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवावर केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. ठाकरेंच्या या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी कालच त्यांच्या दसरा मेळाव्यात प्रत्युत्तर दिलं, त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. हा वाद वाढल्यानंतर आता ठाकरे गटाकडून यावर पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांचं ते वक्तव्य राजकीय दृष्ट्या होतं, त्यांचं विधान व्यक्तीगत नव्हतं, त्यांचा तसा हेतूही नव्हता, असं स्पष्टीकरण शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाची स्क्रीप्ट कोणीतरी लिहून दिली होती. खाली वर करून त्यांची मान दुखली असेल. दीड तास रटाळ भाषण झालं, शिंदे बोलायला उभे राहिले आणि लोक निघून गेली. यांच्यापाठीमागे भाजप आहे, मुद्दाम एवढी मोठी स्क्रीप्ट दिली, असा टोलाही दानवे यांनी लगावला.

दुखावलेल्या बापाचं पत्र! मुलावरची टीका जिव्हारी, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

एकनाथ शिंदे गटाकडून सदस्य नोंदणी फॉर्म भरून घेत असल्याची तक्रार करणार असल्याचंही दानवे म्हणाले. प्रत्येक पक्षाची एक स्वतंत्र घटना असते, हा शिवसेनेचा अधिकृत फॉर्म नाही. माझ्या सक्रीय सदस्यत्वाचं कार्ड आहे, त्यावर उद्धव ठाकरेंची सही आहे. शिंदे गटाचा फॉर्म बोगस आहे, याची आम्ही तक्रार करणार आहोत, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री आता तर मुख्यमंत्री आहे, कार्टं खासदार. पुन्हा डोळे लावून बसले आहेत, नातू नगरसेवक. अरे त्याला मोठं तर होऊ दे, शाळेत जाऊ दे. आताच नगरसेवक? असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

दरम्यान कालच्याच भाषणात एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. नातू नगरसेवकपदावर डोळा लावून बसला आहे. एवढा दीड वर्षांचा बच्चू आहे, रुद्रांश. त्याचा जन्म झाला आणि तुमचं अध:पतन सुरू झालं. तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुमचा मुलगा मंत्री झाला, आम्ही काही बोललो का? असा पलटवार शिंदेंनी ठाकरेंवर केला. आता श्रीकांत शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना पत्र लिहून पलटवार केला आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray