मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara Melava : शिंदे गटात आता कोणते आमदार-खासदार दाखल होणार? ही नावं चर्चेत

Dasara Melava : शिंदे गटात आता कोणते आमदार-खासदार दाखल होणार? ही नावं चर्चेत

वांद्र्याच्या बीकेसी मैदानात एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे आणखी 5 आमदार आणि 2 खासदार सामील होतील, असा गौप्यस्फोट खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 ऑक्टोबर : मुंबईत होणारे दोन दसरा मेळावे आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहेत. दादरच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा तर वांद्र्याच्या बीकेसी मैदानात एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे आणखी 5 आमदार आणि 2 खासदार सामील होतील, असा गौप्यस्फोट खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. एवढंच नाहीतर, शिवसेनेचे राज्यसभेचा एक खासदार, लोकसभेचे दोन खासदार हे पुढील काळामध्ये शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कृपाल तुमाने यांनी आज शिंदेंकडे येणाऱ्या दोन खासदारांपैकी एक खासदार मराठवाड्यातला आणि दुसरा मुंबईचा असेल, असा दावा केला. कृपाल तुमाने यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेत जाणारे ते दोन खासदार कोण? अशा चर्चा सुरू झाल्या. या चर्चांमध्ये दोन खासदारांची नावं सर्वाधिक चर्चेत आहेत. यातलं एक नाव आहे मुंबईतले खासदार गजानन किर्तीकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव.

काहीच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुंबईत गटप्रमुखांचा मेळावा घेतला. या मेळाव्यावेळी गजानन किर्तीकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत भविष्यात आघाडी करायला विरोध दर्शवला. तसंच शिंदेंनी गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांची उपनेते पदी निवड केली होती. एकनाथ शिंदे यांनीही गजानन किर्तीकर यांची घरी जाऊन भेट घेतली होती. तर आषाढी एकादशीच्या वेळी पंढरपूरमध्ये एकनाथ शिंदे आणि संजय जाधव यांची भेट झाली होती.ऑउद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या 50 पैकी 15 आमदार शिल्लक आहेत, तर 40 आमदार आधीच शिंदे गटात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, रविंद्र वायकर, प्रकाश फातर्पेकर, संजय पोतनीस, नितीन देशमुख, वैभव नाईक, भास्कर जाधव, कैलास पाटील, सुनिल राऊत, रमेश कोरगावंकर, अजय चौधरी, राजन साळवी हे आमदार आहेत. यातल्या राजन साळवी यांनी रिफायनरीवरून घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेचं वरिष्ठ नेतृत्व राजन साळवी यांच्यावर नाराज झालं होतं. राजन साळवी यांनीही आपण ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

शिवसेना खासदार ठाकरे गट

अरविंद सावंत

विनायक राऊत

गजानन किर्तीकर

ओमराजे निंबाळकर

राजन विचारे

संजय जाधव

शिवसेना खासदार शिंदे गट

श्रीकांत शिंदे

राहुल शेवाळे

भावना गवळी

संजय मंडलिक

धैर्यशील माने

कृपाल तुमाने

श्रीरंग बारणे

हेमंत गोडसे

हेमंत पाटील

सदाशीव लोखंडे

प्रतापराव जाधव

राजेंद्र गावित

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray