मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार का? तिन्ही बाजूचा युक्तीवाद संपला; काहीच वेळात होणार निर्णय?

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार का? तिन्ही बाजूचा युक्तीवाद संपला; काहीच वेळात होणार निर्णय?

पहिला अर्ज आम्ही दिला असल्याचा युक्तीवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी मांडला आहे. तिन्ही बाजूचा युक्तीवाद संपला आहे. त्यामुळे या प्रकरणावर कोर्ट आजच निर्णय देऊ शकतं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 23 सप्टेंबर : शिवसेना दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्क मैदानावर होणार की नाही हा प्रश्न न्यायालयात पोहोचला आहे. न्यायालयात या प्रश्नावर नुकतीच सुनावणी झाली. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परंपरेनुसार आपल्याला परवानगी मिळावी अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने केली होती. मात्र, बदललेली राजकीय पार्श्वभूमी आणि एकनाथ शिंदे गटानेही समांतर अर्ज दाखल केला. त्यामुळे महापालिकेने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत दोन्ही पक्षांना परवानगी नाकारली. यावरुन शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याच याचिकेवर न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली. यावेळी शिवसेना (ठाकरे गट) - एस्पि चिनॉय, शिवसेना (शिंदे गट) - जनक द्वारकादास आणि बीएमसीचे वकील मिलिंद साठ्ये यांनी आपला युक्तीवाद मांडला आहे. पहिला अर्ज आम्ही दिला असल्याचा युक्तीवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी मांडला आहे. तिन्ही बाजूचा युक्तीवाद संपला आहे. त्यामुळे या प्रकरणावर कोर्ट आजच निर्णय देऊ शकतं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिन्ही गटाचे युक्तीवाद ऐकल्यानंतर आता कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोर्ट या प्रकरणावर काय निर्णय देणार आणि शिवतीर्थावर कोणाचा आवाज घुमणार की दोन्ही गटांना याठिकाणी दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळणार नाही? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
First published:

Tags: Cm eknath shinde, Uddhav thackeray

पुढील बातम्या