मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara Melava : शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी फुड पॅकेट तयार, कार्यकर्त्यांना मिळणार 'मेजवानी'

Dasara Melava : शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी फुड पॅकेट तयार, कार्यकर्त्यांना मिळणार 'मेजवानी'

दसरा मेळाव्यानिमित्त मुंबईमधलं राजकीय वातावारण तापायला सुरूवात झाली आहे. यावेळी पहिल्यांदाच मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

अमित राय, 4 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यानिमित्त मुंबईमधलं राजकीय वातावारण तापायला सुरूवात झाली आहे. यावेळी पहिल्यांदाच मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात होणार आहे. या दोन्ही दसरा मेळाव्यांसाठी कार्यकर्ते राज्याच्या वेगवेगळ्या भागातून यायला सुरूवात झाली आहे. पोलिसांनीही कोणताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

शिंदे गटाकडून कार्यकर्त्यांसाठी खाण्याची खास सोय करण्यात आली आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी ठाण्याच्या प्रशांत कॉर्नरमधून फुड पॅकेट ऑर्डर करण्यात आली आहेत. शिंदे गटाकडून प्रशांत कॉर्नरला तब्बल अडीच लाख फुड पॅकेट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. या फुड पॅकेटमध्ये कचोरी, गुलाबजाम, खाकरा यांच्यासह अन्य पदार्थही या फुड पॅकेटमध्ये असतील.

दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंचा सामना, मुंबई पोलिसांचा ऍक्शन प्लान तयार, नांगरे-पाटील मैदानात!

दसरा मेळाव्यासाठी जवळपास अडीच-तीन लाख कार्यकर्ते येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 'दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या गाड्यांसाठी दहा मैदानं बूक केली आहेत. जे कार्यकर्ते येतील त्यांच्या जेवणाची, पाण्याची आणि वॉशरूमची व्यवस्था नीट झाली पाहिजे. हे कार्यकर्ते आपल्यासाठी येत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,' अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना दिल्या आहेत.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray