मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara Melava : दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंचा सामना, मुंबई पोलिसांचा ऍक्शन प्लान तयार, नांगरे-पाटील मैदानात!

Dasara Melava : दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंचा सामना, मुंबई पोलिसांचा ऍक्शन प्लान तयार, नांगरे-पाटील मैदानात!

दसरा मेळाव्याआधी मुंबईतलं राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे, यावेळी पहिल्यांदाच मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

अमित राय, मुंबई, 4 ऑक्टोबर : दसरा मेळाव्याआधी मुंबईतलं राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे, यावेळी पहिल्यांदाच मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वांद्र्याच्या बीकेसी मैदानात दसरा मेळावा घेणार आहेत. या दोन्ही मेळाव्यांसाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते यायला सुरूवात झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होऊ नये, यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे.

मुंबईमध्ये या दोन दसरा मेळाव्याशिवाय देवीचं विसर्जनही होणार आहे, त्यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शिवाजी पार्क आणि बीकेसी मध्ये पोलिसांनी चेन सिस्टीममध्ये बंदोबस्त केला आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये समनव्य राहावा, यासाठी डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांचा व्हॉट्सऍप ग्रुपही बनवण्यात आला आहे.

प्रत्येक डीसीपीच्या अखत्यारीत 4 एसीपी असतील, या एसीपींना 10-12 पोलिसांची टीम रिपोर्ट करेल. मुंबईत ठिकठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातूनही नजर ठेवली जाणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सुरक्षा स्टेशनही बनवण्यात आली आहेत.

दोन्ही दसरा मेळावे आणि नवरात्र विसर्जनासाठी मुंबईत 3,200 ऑफिसर, 15,200 पोलीस, 1,500 एसआरपीएफचे जवान, 1,000 होमगार्ड, 20 क्युआरटी टीम आणि 15 बीडीडीएस टीमचा समावेश आहे. या दोन्ही दसरा मेळाव्यांआधी मुंबईच्या कायदा-सुव्यवस्थेचे जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे पाटील यांनी सुरक्षेची पाहणी केली.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray