मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara Melava : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, तिसरे ठाकरे शिंदे गटात दाखल!

Dasara Melava : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, तिसरे ठाकरे शिंदे गटात दाखल!

दसरा मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्क्यांमागे धक्के दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात एक दोन नव्हे तर तब्बल 3 ठाकरे सामील झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्क्यांमागे धक्के दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात एक दोन नव्हे तर तब्बल 3 ठाकरे सामील झाले आहेत. स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे यांच्यापाठोपाठ जयदेव ठाकरे यांनीदेखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. जयदेव ठाकरे हे थेट बीकेसी मैदानातल्या दसरा मेळाव्याच्या स्टेजवर दाखल झाले.

जयदेव ठाकरे शिंदे गटात जाण्याआधी स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे हेदेखील बीकेसीच्या मेळाव्यात आले होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर स्मिता ठाकरे यांची भेट घेतली होती. तर वकील असलेल्या निहार ठाकरे हे सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदेंची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या टीममध्ये होते.

कोण आहेत निहार ठाकरे?

निहार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत थोरले चिरंजीव बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांना तीन मुलं होती. त्यापैकी बिंदूमाधव हे थोरले चिरंजीव होते. त्यानंतर जयदेव ठाकरे हे मधले आणि उद्धव ठाकरे हे सर्वात लहान चिरंजीव आहेत. बिंदूमाधव यांचं 20 एप्रिल 1996 रोजी लोणावळा इथे एका मोटार अपघातात निधन झालं होतं. बिंदूमाधव यांच्या पश्चात त्यांचा मुलगा निहार ठाकरे आणि नेहा अशी दोन मुलं आहेत. निहार खरंतर पेशाने वकील आणि व्यावसायिक आहेत. त्यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे.

कोण आहेत जयदेव ठाकरे?

बाळासाहेब यांचे दुसरे चिरंजीव जयदेव यांनी तीन लग्न केली. यातील पहिली पत्नी जयश्री कलेकर यांच्यापासून एक मुलगा आहे.

जयदीप असं त्यांचं नाव आहे. दुसरी पत्नी स्मिता ठाकरे यांच्यापासून राहुल आणि ऐश्वर्य अशी दोन मुलं आहेत. तर तिसरी पत्नी अनुराधा यांच्यापासून जयदेव यांना माधुरी नावाची एक मुलगी आहे. जयदेव ठाकरे यांना तीन बायकांपासून एकूण चार मुलं आहेत.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray