मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा वादात, ट्रेनच्या स्क्रीनवर Live सभा कुणी लावली? रेल्वेची नोटीस

एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा वादात, ट्रेनच्या स्क्रीनवर Live सभा कुणी लावली? रेल्वेची नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा बुधवारी मुंबईमध्ये दसरा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 6 ऑक्टोबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा बुधवारी मुंबईमध्ये दसरा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात झाला. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईमध्ये दोन दसरा मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या दोन्ही सभांमध्ये ठाकरे आणि शिंदे यांनी एकमेकांवर हल्ले आणि प्रतिहल्ले केले, पण एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वादात सापडला आहे.

दुखावलेल्या बापाचं पत्र! मुलावरची टीका जिव्हारी, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये लावण्यात आलेल्या स्क्रीनवर एकनाथ शिंदे यांच्या दसरा रॅलीचं प्रसारण करण्यात आलं, त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. बुधवारी पश्चिम रेल्वेच्या एका लोकल ट्रेनच्या स्क्रीनवर शिंदेंच्या रॅलीचं प्रसारण सुरू होतं. ही माहिती मिळताच रेल्वेने स्क्रीन लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टरला नोटीस पाठवली आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून अशाप्रकारे दसरा मेळाव्याची सभा लाईव्ह दाखवायला परवानगी देण्यात आली नव्हती. अशाप्रकारे राजकीय कार्यक्रम लाईव्ह कसा दाखवला गेला, याच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचंही पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

नॉन फेअर रेव्हेन्यू म्हणजेच तिकिटाव्यतिरिक्त महसूल मिळावा म्हणून रेल्वेने फक्त जाहिरातींसाठी कंत्राटी पद्धतीवर डब्ब्यांमध्ये स्क्रीन लावण्याची परवानगी दिली आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena