मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लाव रे तो व्हिडिओ! दसरा मेळाव्याआधी शिंदेंची 'राज' स्टाईल, उद्धव ठाकरेंवर प्रहार

लाव रे तो व्हिडिओ! दसरा मेळाव्याआधी शिंदेंची 'राज' स्टाईल, उद्धव ठाकरेंवर प्रहार

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधी राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरूवात झाली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटांकडून रोज वेगवेगळे टिझर प्रसिद्ध केले जात आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 ऑक्टोबर : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधी राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरूवात झाली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटांकडून रोज वेगवेगळे टिझर प्रसिद्ध केले जात आहेत. आता तर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्याचे जुने व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करतानाच भाजपसोबत युती का केली, याचं स्पष्टीकरण देत आहेत.

2019 च्या निवडणुकांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची लाव रे तो व्हिडिओ ही टॅगलाईन प्रसिद्ध झाली होती, त्याच धर्तीवर शिंदे गटाकडूनही उद्धव ठाकरेंचे जुने व्हिडिओ शेअर केले जात आहेत.

'मातोश्री'ला आणखी एक धक्का? उद्धव ठाकरेंची सगळ्यात जवळची व्यक्ती शिंदेंकडे जाणार!

शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात विसर न व्हावा हे कॅम्पेन सुरू करण्यात आलं आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून ही आक्रमक रणनिती आखली जात आहे. ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात केलेली वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहेत. विसर न व्हावा या टॅगलाईनसह उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे.

निष्ठा विचारांशी, लाचारांशी नाही, असं कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या या व्हिडिओमध्ये काँग्रेस तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

दसरा मेळाव्याआधी टिझर युद्ध, ठाकरे-शिंदेंमध्ये व्हिडिओतून चकमक

5 ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होणार आहेत. वांद्र्याच्या बीकेसी मैदानात शिंदे गटाचा तर दादरच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होईल. अनेक जण आपल्यासोबत येण्यासाठी इच्छूक आहेत, त्यांचा पक्षप्रवेश दसरा मेळाव्यात होईल, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काहीच दिवसांपूर्वी केला होता, त्यानंतर आता शिंदे गटात कोण प्रवेश करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Raj Thackeray, Shivsena, Uddhav Thackeray