मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara Melava : 'तुम्ही राष्ट्रवादीकडे पक्ष गहाण टाकला', एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर चौफेर टीका

Dasara Melava : 'तुम्ही राष्ट्रवादीकडे पक्ष गहाण टाकला', एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर चौफेर टीका

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी अगोदरपासूनच प्रचंड जय्यत तयारी करण्यात आलेली होती. त्यामुळे शिंदेंच्या मेळाव्याला लाखो नागरिकांनी हजेरी लावली.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी अगोदरपासूनच प्रचंड जय्यत तयारी करण्यात आलेली होती. त्यामुळे शिंदेंच्या मेळाव्याला लाखो नागरिकांनी हजेरी लावली.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी अगोदरपासूनच प्रचंड जय्यत तयारी करण्यात आलेली होती. त्यामुळे शिंदेंच्या मेळाव्याला लाखो नागरिकांनी हजेरी लावली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 5 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासवर चौफेर टीका केली. विशेष म्हणजे सिवसेना नेमकी कुणाची ते आता जनसागर पाहून सांगायची गरज नाही, असं ते म्हणाले. "इथे अथांग जनसागल उसळला आहे. खरी शिवसेना कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रालाच नाही तर भारताला या जनसागराने दिला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसादर कोण आहेत? मला वाटतं यापुढे असा प्रश्न कुणालाही पडणार नाही हे आपल्या या गर्दीने सिद्ध केलं आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

"तुम्ही न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळवलंत. मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे. पण मी ठरवलं होतं की मैदान देण्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. सदा सरवणकर यांनी सर्वात आधी अर्ज केला होता. मैदान मिळालं असतं. पण या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझी आहे. मला सांगायचं काय ते तुम्हाला मिळाली आहे. मैदान जरी तुम्हाला मिळालं असलं तरी शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्यासोबत आहेत. शिवसेनाप्रमुखांची भूमिका आमच्यासोबत आहे आणि ही परंपरा तुम्ही मोडीत काढलीत", अशी टीका शिंदेंनी केली.

"सत्तेच्या हव्यासापोटी हिंदुत्वाच्या विचारांना तुम्ही मूठमाती दिली. मग सांगा तुम्हाला त्या जागेवर उभं राहण्याचा नैतिक अधिकार मिळतो का? बोलण्याचा नैतिक अधिकार उरलाय का? हजारो शिवसैनिकांनी आपलं घाम, रक्त सांडून जो पक्ष उभा केला तो तुम्ही वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी, महत्त्वकांक्षासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे गहाण टाकला. बाळासाहेब रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. तुम्ही तर सरकार आणि पक्षाचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला, त्यांच्या तालावर तुम्ही नाचू लागला आणि आम्हालाही नाचवायला लागलात", असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला.

" isDesktop="true" id="769915" >

राज्यभरात आज दसऱ्याचा उत्साह आहे. या उत्साहादरम्यान महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत विचारांचं सोनं लुटण्यासाठी हजारो नागरिकांचा जनसमुदायल लोटला. मुंबईत आज शिवसेनेचे दोन मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. एक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा बीकेसी मैदानावरील भव्य दसरा मेळावा, तर दुसरा म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील दसरा मेळावा. दोन्ही मेळाव्यांकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. या मेळाव्यात कोण काय भूमिका मांडणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी अगोदरपासूनच प्रचंड जय्यत तयारी करण्यात आलेली होती. त्यामुळे शिंदेंच्या मेळाव्याला लाखो नागरिकांनी हजेरी लावली. त्या तुलनेने ठाकरे गटाच्या मेळाव्यात कमी गर्दी बघायला मिळतेय. पण दोन्ही मेळाव्यात अफाट गर्दी बघायला मिळतेय.

First published:

Tags: Eknath Shinde, Maharashtra politics, Shiv sena