मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara Melava : ना शिंदेंचा दसरा मेळावा बघणार ना ठाकरेंचा, मग काय करणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं

Dasara Melava : ना शिंदेंचा दसरा मेळावा बघणार ना ठाकरेंचा, मग काय करणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं

दसरा मेळावा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागलं आहे. दसरा मेळाव्याआधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेवर भाष्य केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 4 ऑक्टोबर : दसरा मेळावा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागलं आहे. मुंबईमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून कार्यकर्ते मुंबईत येत आहेत. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संघर्ष होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.

दसरा मेळाव्याआधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेवर भाष्य केलं आहे. दोन्ही दसरा मेळावे अत्यंत व्यवस्थित पार पडतील. कायदा आणि सुव्यवस्थेचं कठोर पालन केलं जाईल. मात्र सध्या जी परिस्थिती आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशविघातक कृत्य करणाऱ्या कोणी या गर्दीचा गैरफायदा घेऊ नये, कायदा कडक कारवाई करेल, असं फडणवीस म्हणाले आहेत.

दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंचा सामना, मुंबई पोलिसांचा ऍक्शन प्लान तयार, नांगरे-पाटील मैदानात!

दसरा मेळाव्यातील भाषणं योग्य भाषेत होणं अपेक्षित आहे. भाषण हे खुसखुशीत करता येतं, कोणाची अवमानकारक वक्तव्य नसावीत. काही चुकीची वक्तव्य झाली तर कायदा त्याचं काम करेल, असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

दसरा मेळाव्याचं कोणाचं भाषण पाहणार? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, तेव्हा मी दोन्ही दसरा मेळाव्याची भाषणं पाहणार नाही, त्यावेळी नागपुरात धम्म चक्र प्रवर्तन कार्यक्रमात सहभागी होणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही कोणाचं भाषण पाहणार, असं विचारण्यात आलं, त्यावेळी दोन्ही गटाचं भाषण एकाचवेळी सुरू झालं तर आधी उद्धव ठाकरेंचं भाषण बघणार आणि नंतर एकनाथ शिंदेंचं असं अजित पवार म्हणाले.

शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी फुड पॅकेट तयार, कार्यकर्त्यांना मिळणार 'मेजवानी'

First published:

Tags: Cm eknath shinde, Devendra Fadnavis, Shivsena, Uddhav Thackeray