मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara Melava : आनंद दिघेंची प्रॉपर्टी आणि ठाकरेंचा तो प्रश्न, एकनाथ शिंदेंचा खळबळजनक आरोप

Dasara Melava : आनंद दिघेंची प्रॉपर्टी आणि ठाकरेंचा तो प्रश्न, एकनाथ शिंदेंचा खळबळजनक आरोप

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो

वांद्र्याच्या बीकेसी मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 ऑक्टोबर : वांद्र्याच्या बीकेसी मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तुम्ही आनंद दिघेंचे पाय कापले, दिघे गेल्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो, तेव्हा तुम्ही मला दिघेंच्या प्रॉपर्टीविषयी विचारलंत, असा खळबळजनक दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

नारायण राणेंना बाजूला करून तुम्हाला तेव्हाच मुख्यमंत्री व्हायचं होतं. लोकांचे पाय कापताना पक्षाचे पाय कापता, अशी टीका शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख कटप्पा असा केला, त्यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता, असं एकनाथ शिंदे म्हणाले. सेवा करणाऱ्या थापाची तुम्ही अवहेलना केली. पायाखालची जमीन सरकल्यामुळे तुम्ही आता काहीही बोलत असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

'तुम्ही कोरोना काळाच सर्वसामान्य गरिबांची दुकानं बंद केली, बाजारपेठा बंद केल्या, पण तुमचे दुकानं सुरु होती', असं धक्कादायक विधानही एकनाथ शिंदे यांनी केलं.

"तुम्ही आज सांगता की भाजपसोबत जायचं होतं तर राजीनामा देऊन जायचं होतं. २०१९ साली जेव्हा तुम्ही महाविकास आघाडी सरकारसोबत गेले तेव्हा तुम्ही राजीनामे दिले होते का? तुम्ही जनादेशाच्या विरोधात गेले. जनतेच्या मनाविरुद्ध तुम्ही गेले. तेव्हा राजीनामे दिले? अडीच वर्षात तुम्ही कितीवेळ मंत्रालयात गेलात? अडीच वर्षात फक्त अडीच तास? कसं सरकार चालणार? कसा कारभार चालणार? असा सवाल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना विचारला.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray