महाराष्ट्राचा महासंग्राम : दर्यापूर मतदारसंघात युतीमध्ये चढाओढ

महाराष्ट्राचा महासंग्राम : दर्यापूर मतदारसंघात युतीमध्ये चढाओढ

विद्यमान आमदार रमेश बुंदिले आणि त्यांचे समर्थक युती झालीच तर दर्यापूर भाजपकडेच राहिलं पाहिजे, यासाठी आग्रही आहेत तर शिवसेनेचे पदाधिकारीही इथे जोरदार तयारी करतायत. वंचित बहुजन आघाडीतर्फे संतोष कोल्हे यांचंही नाव समोर येतंय.

  • Share this:

अमरावती, 17 सप्टेंबर : अमरावती जिल्ह्यातला दर्यापूर मतदारसंघ राखीव आहे. इथे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा मुलगा कॅ. अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी दिली जाते. पण 2014 च्या निवडणुकीत इथे भाजपचा विजय झाला. या निवडणुकीत शिवसेनेच्या कॅप्टन अभिजीत अडसूळ यांचा पराभव करुन भाजपचे रमेश बुंदिले आमदार झाले.

यावर्षी 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती होणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय. त्यामुळे या मतदारसंघात मोठा पेच निर्माण होणार आहे. दर्यापूर हा मतदार संघ शिवसेनेकडे जाणार की भाजपला मिळणार यावर इथली राजकीय समीकरणं अवलंबून आहेत.

विद्यमान आमदार रमेश बुंदिले आणि त्यांचे समर्थक युती झालीच तर दर्यापूर भाजपकडेच राहिलं पाहिजे, यासाठी आग्रही आहेत तर शिवसेनेचे पदाधिकारीही इथे जोरदार तयारी करतायत. वंचित बहुजन आघाडीतर्फे संतोष कोल्हे यांचंही नाव समोर येतंय.

महाराष्ट्राचा महासंग्राम : श्रीरामपूरमध्ये विखेंच्या हाती आमदारकीची चावी

भाजपतर्फे विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांच्यासह सीमा सावळे याही इच्छुक आहेत. तर काँग्रेसतर्फे सुधाकरराव तलवारे, श्रीराम नेहर हे इच्छुक आहेत. तर आरपीआयकडून अमित मेश्राम, बळवंत वानखडे आणि रामेश्वर अभ्यंकर इच्छुक असून काँग्रेस-आरपीआयची युती झाली तर कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल.

कुणबी मराठा समाजाचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात दर्यापूर आणि अंजनगाव ही दोन शहरं निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहेत.

दर्यापूर विधानसभा निवडणूक 2014 मतदान

रमेश बुंदिले, भाजप - 64 हजार 224

बळवंत वानखडे, रिपाइं गवई - 44 हजार 642

=====================================================================================

VIDEO: पंतप्रधान मोदींच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचं उद्घाटन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 07:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading