मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दर्शन सोळंकी प्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, IIT बॉम्बेमध्ये प्रश्नपत्रिकेवर सुसाइड नोट

दर्शन सोळंकी प्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, IIT बॉम्बेमध्ये प्रश्नपत्रिकेवर सुसाइड नोट

एसआयटीच्या पथकाला सोळंकीच्या खोलीत काही महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. यात एका प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या पानावर सुसाइड नोट आढळून आलीय.

एसआयटीच्या पथकाला सोळंकीच्या खोलीत काही महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. यात एका प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या पानावर सुसाइड नोट आढळून आलीय.

एसआयटीच्या पथकाला सोळंकीच्या खोलीत काही महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. यात एका प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या पानावर सुसाइड नोट आढळून आलीय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 मार्च : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीच्या पथकाला सोळंकीच्या खोलीत काही महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. यात एका प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या पानावर सुसाइड नोट आढळून आलीय. दरम्यान, अद्याप या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. मुंबई पोलिसांच्या उच्च सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,या सुसाईड NOT मध्ये दर्शन सोळंकीनं प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं की, अरमाननं मला मारलं आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रश्नपत्रिकेचं शेवटचं पान कोरे होते आणि त्याच्या मागील बाजूस एक हस्तलिखित नोट सापडली होती. जी रनिंग फॉन्टमध्ये लिहिलेली होती. सोळंकीनं आत्महत्या केलेल्या IIT वसतिगृहातील 802 क्रमांकाच्या खोलीचा पंचनामा SITनं केला तेव्हा हे आढळून आलं.

गाडी समोर आले अन् 1 कोटी घेऊन गेले, सांगलीत द्राक्ष व्यापाऱ्याला लुटलं

मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही चिठ्ठी सापडली, जेव्हा टीमनं त्याच्या खोलीची झडती घेतली. दर्शनच्या कुटुंबीयांना 11 मार्चला रोजी पोलिसांच्या पथकानं फोन करून त्यांना या वस्तुस्थितीची माहिती दिली. दर्शन सोळंकीच्या कुटुंबीयांनी मुंबईला येऊन पोलिसांच्या ताब्यात त्याच्या जुन्या नोट्स आणि पुस्तकं दिल्या. हस्तलेखन विश्लेषणासाठी सुसाईड नोट पाठवण्यात आली असून त्याच्या आईने पुष्टी केली आहे की हे दर्शनचेच हस्ताक्षर आहे. या प्रकरणात पुढील तपास करण्यासाठी तज्ञांच्या अहवालाची, पोलीसांना प्रतीक्षा आहे

चिठ्ठीत अरमान खत्रीच्या नावाचा उल्लेख

दरम्यान, दर्शनच्या कुटुंबि्यांनी या प्रकरणात नवीन FIR नोंदवण्यासाठी थोडा वेळ, पोलिसांकडे मागितला आहे. त्यांच्या फ्रेश तक्रारीची आम्ही वाट पाहत आहोत अशी एसआयटीच्या अधिकाऱ्याकडून माहिती मिळतेय. चिठ्ठीत अरमान खत्रीच्या नावाचा उल्लेख असल्याबाबत टीमनं IITच्या व्यवस्थापनालाही कळवल्याची माहिती समजते.

पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

दर्शनच्या मृत्यूपूर्वीच्या आठवडाभरात अरमान आणि दर्शन यांच्यात काही वाद, तणाव असल्याचं,तपासादरम्यान SIT टीमला आढळून आलंय. तपासाचा एक भाग म्हणून,सोळंकीच्या खोलीची सुमारे 10 तास संपूर्ण तपासणी करण्यात आली, तेव्हाच सुसाईड नोट सापडली. या घडामोडीनं,पवई पोलिसांच्या तपासावर मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. पवई पोलिसांना सुसाईड नोट का सापडली नाही ? त्यांनी खरोखर योग्य तपास केला का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत IITच्या प्राध्यापकांच्या पथकानं केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालावरही प्रश्न उपस्थित केले जाताय. ज्यात सोळंकीला,आत्महत्या करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं म्हटलंय.

First published:
top videos

    Tags: Mumbai