Home /News /maharashtra /

ATM मध्ये काळोख केला अन् 17 लाखांची रोकड अवघ्या काही मिनिटात केली गायब, विरारमधील घटना

ATM मध्ये काळोख केला अन् 17 लाखांची रोकड अवघ्या काही मिनिटात केली गायब, विरारमधील घटना

चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी एटीएमच्या सीसीटीव्हीला काळोख करून पद्धतशीरपणे एटीएम चा दरवाजा तोडला

चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी एटीएमच्या सीसीटीव्हीला काळोख करून पद्धतशीरपणे एटीएम चा दरवाजा तोडला

चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी एटीएमच्या सीसीटीव्हीला काळोख करून पद्धतशीरपणे एटीएम चा दरवाजा तोडला

विरार, 18 मे : मुंबई जवळील विरारमध्ये (virar) चोरट्यांनी एटीएम मशीन फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एटीएम मशीन (sbi atm) फोडून तब्बल 17 लाख 21 हजार रुपये लंपास केले आहे.  याप्रकरणी विरार पोलीस (virar police) ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेकडील गांधीचौक परिसरात नागरिक साखर झोपेत असताना पहाटे 4 च्या सुमारास एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये (sbi bank atm ) चोरी झाल्याची घटना उघडकीस आली.  गांधीचौक परिसरात  राजा अपार्टमेंट एसबीआय बॅंकेच एटीएम आहे. बुधवारी पहाटे 4 च्या सुमारास वर्दळ कमी असल्याची चोरट्यांनी संधी साधली.
(राज्यसभेसाठी संभाजीराजेंसमोर शिवसेनेचाच पर्याय? सेना खासदारचे सूचक विधान) 3 ते 4 चोरट्यांनी एटीएमचे दार गॅस कटरने कापले आणि 17 लाख 21 हजार 900 रुपये चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी एटीएमच्या सीसीटीव्हीला काळोख करून पद्धतशीरपणे एटीएम चा दरवाजा तोडला, काही मिनिटांच्या आत चोरटे 17 लाखांची रोकड घेऊन पसार झाले. (पुणे : पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून...) सकाळी 10 वाजेच्या सुमारास या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी स्थानिक गेले असता हा प्रकार समोर आला आहे. विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. तसंच परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू असून पुढील तपास विरार पोलीस करीत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या