मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दापोली ते आंबेनळी घाट - 'त्या' चार तासांत काय घडलं ?

दापोली ते आंबेनळी घाट - 'त्या' चार तासांत काय घडलं ?

रायगडच्या पोलादपूर येथे मोठा भीषण अपघात झालाय. महाबळेश्वरला सहलीसाठी निघालेल्या या खाजगी बसमध्ये एकूण ३४ जण होते त्यापैकी ३३ जणांचा मृ्त्यू झाला आहे.

रायगडच्या पोलादपूर येथे मोठा भीषण अपघात झालाय. महाबळेश्वरला सहलीसाठी निघालेल्या या खाजगी बसमध्ये एकूण ३४ जण होते त्यापैकी ३३ जणांचा मृ्त्यू झाला आहे.

रायगडच्या पोलादपूर येथे मोठा भीषण अपघात झालाय. महाबळेश्वरला सहलीसाठी निघालेल्या या खाजगी बसमध्ये एकूण ३४ जण होते त्यापैकी ३३ जणांचा मृ्त्यू झाला आहे.

  मुंबई, ता. 28 जुलै : रायगडच्या पोलादपूर येथे मोठा भीषण अपघात झालाय. महाबळेश्वरला सहलीसाठी निघालेल्या या खाजगी बसमध्ये एकूण ३४ जण होते त्यापैकी ३३ जणांचा मृ्त्यू झाला आहे. जाणून घेऊया दापोली ते आंबेनळी घाट या चार तासात काय घडलं...

  - चौथा शनिवार आणि रविवार म्हणून कोकण कृषी विद्यापीठाचे ४० जण महाबळेश्वरला सहलीसाठी निघाले होते.

  - मात्र, बसमध्ये सीट्स कमी असल्यामुळे ४० ऐवजी ३३ जणांना घेऊन ही बस ६.३० वाजता दापोलीवरून महाबळेश्वरच्या दिशेने निघाली.

  - सहलीसाठी कोकण कृषी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेण्यात आली होती.

  - दापालीहून निघालेली ही खासगी बस सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-आंबेनळी घाटातून जात होती.

  - तेवढ्यात अंगाचा थरकाप उडविणारी घटना घडली.

  - सहलीसाठी निघालेली ही बस डाव्या बाजुने रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरुन खोल दरीत कलंडली.

  - काही कळायच्या आतच ही बस ८०० फूट खोल दरीत कोसळली.

  - अपघात घडला ते ठिकाण अवघड वळणाचं किंवा अपघातग्रस्त ठिकाण नव्हतं.

  - बस दरीत कोसळत असताना, त्याच बसमध्ये प्रवास करित असलेले प्रकाश सावंत-देसाई हे बसमधून बाहेर फेकल्या गेले.

  - ते जिथे पडले तिथून बस खूप खाली कोसळली होती.

  - भानावर येताच हाताला लागेल त्याचा आधार घेत प्रकाश सावंत सुखरूप वर आले.

  - वर येताच त्यानी जवळ अललेल्या त्यांच्या मोबाईलवरुन नातेवाईकांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेंज नसल्यामुळे त्यांचा कुणाशीच संपर्क होऊ शकला नाही.

  - त्याचवेळेस बस दरीत कोसळल्याने झालेला मोठा आवाज ऐकून जवळच्याच धबधब्यावर सहलीसाठी आलेले युवक वर रस्त्यावर धावत आले.

  - घडला प्रकार समजताच त्या युवकांपैकी एका युवकाने रेंज असलेला त्याचा मोबाईल प्रकाश सावंत यांना दिला आणि ते सर्वजण मुंबईच्या दिशेने निघून गेले.

  - त्यानंतर प्रकाश सावंत यांनी फोन नंबर लक्षात असल्याने त्यांचा एक मित्र अजित आणि दापोली पोलिसांना यांना घटनेची माहिती दिली.

  - प्रकाश सावंत यांचे मित्र अजित आणि दापोली पोलिसांनी तात्काळ या घटनेची वार्ता सगळीकडे पोहोचवली. माहीती मिळताच दापोली पोलिस आणि पुण्याहून एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली.

  - सर्वाप्रथम दुपारी १२.३० वाजता महाबळेश्वरचे ट्रेकर्स घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्याला सुरूवात केली.

  - ८०० फूट दरीत कोसळल्याने चेंदामेंदा झाला असून, प्रकाश सावंत वगळता सहलीला निघालेल्या या बसमधील इतर ३३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे एनडीआरएफच्या बचाव पथकाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

  - सायंकाळपर्यंत बचाव पथकाने दरीतून २० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

  - मृतदेह बाहेर काढण्याचे काम एनडीआरएफचे पथक करित असून, अंधार पडल्यामुळे आता या कामात व्यत्यय निर्माण होतोय.

  First published:

  Tags: Ambedali Ghat, Dapoli, In four hours, What happened, आंबेनळी घाट, काय घडलं, त्या' चार तासांत, दापोली, पोलादपूर, रायगड