• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दापोलीच्या 30 कर्मचाऱ्यांच्या आता उरल्या फक्त आठवणी
  • VIDEO : दापोलीच्या 30 कर्मचाऱ्यांच्या आता उरल्या फक्त आठवणी

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2018 01:24 PM IST | Updated On: Jul 30, 2018 01:36 PM IST

    दापोली, 30 जुलै : पोलादपूर घाटातल्या अपघातामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज दापोलीतल्या कोकण कृषी विद्यापीठात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यापीठातले कर्मचारी आज कामावर आले, पण त्यांचे अनेक सहकारी त्यांच्या शेजारी नव्हते.. खरंतर ते आता कधीच त्यांच्या सोबत नसतील. या गोष्टीचा कर्मचाऱ्यांना खूप त्रास होतोय.. पण नियतीच्या क्रूर चेष्टेमुळे संपूर्ण राज्यच हेलावून गेलं. विद्यापीठात ते जिथे बसायचे, काम करायचे. त्या खुर्च्या आज रिकाम्या आहेत. ही बातमी देताना देखील खूप त्रास होतोय. ज्या कार्यालयात शुक्रवारपर्यंत कामाबरोबरच गप्पागोष्टी चालायच्या, एकमेकांची सुखदुख शेअर केली जायची, त्या कार्यालयातले 30 जण आता कधीच परतणार नाहीत. जे कर्मचारी कामावर आलेत, त्यांना कार्यालयात राहणं किती कठीण जात असेल, त्याची कल्पनाही करवत नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading