Home /News /maharashtra /

Dapoli Nagarpanchayat: रामदास कदमांना मोठा झटका, दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अनिल परब यांच्या गटाच्या ममता मोरे

Dapoli Nagarpanchayat: रामदास कदमांना मोठा झटका, दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अनिल परब यांच्या गटाच्या ममता मोरे

नगरपंचायत नगराध्यक्षपद निवडणूक: दापोलीत अनिल परबांचा रामदास कदमांना पुन्हा झटका

नगरपंचायत नगराध्यक्षपद निवडणूक: दापोलीत अनिल परबांचा रामदास कदमांना पुन्हा झटका

दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रामदास कदम यांच्या गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.

    शिवाजी गोरे, प्रतिनिधी दापोली, 11 फेब्रुवारी : रत्नागिरीत पुन्हा एकदा शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसून आलं. दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Dapoli Nagar Panchayat Nagaradhyakhya Election) माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) विरुद्ध पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यातील वाद पहायला मिळाला. या निवडणुकीत पुन्हा एकदा अनिल परब यांच्या गटाने सरशी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता मोरे (Shiv Sena Mamata More) यांची वर्णी लागली आहे. रामदास कदम यांच्या गटासाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता मोरे तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक खालिद रखांगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेनेच्या ममता मोरे यांच्या विरोधात शिवसेनेच्या नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक अटीतटीची बनली होती. परंतु शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य आघाडीवर ठाम होते, त्यामुळे शिवानी खानविलकर यांनी नगराध्यक्षपदासाठी भरलेला उमेदवारी अर्ज निरर्थक बनला आहे. शिवसेनेचे बंडखोर अपक्ष नगरसेवक यांच्या पाठिंब्यावर शिवानी खानविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु बहुमताच्या जादूई आजचा आकडा गाठणे शिवानी यांना शक्य झाले नाही. शिवसेनेकडून व्हीप सुद्धा बजावण्यात आला होता. शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदाच नगरसेविका बनलेल्या तरुण नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी पदार्पणातच पक्षाविरोधात बंड केल्याने शिवसेनेत अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम व जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यातील वादामुळे निवडणुकीत शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची आघाडी नगरपंचायत निवडणुकीत झाले. परंतु ही आघाडी विद्यमान आमदार योगेश कदम यांना मान्य नव्हती त्यामुळे आमदार समर्थकांनी निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविली होती. परंतु नागरिकांनी मात्र आघाडीला स्पष्ट बहुमत दिले आहे. वाचा : किरीट सोमय्या पुण्यात दाखल; ज्या पायऱ्यांवर झाला हल्ला तिथेच भाजप सत्कार करणार, पुन्हा राडा होणार? नगराध्यक्षपदासाठी अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला असून पहिले अडीच वर्ष नगराध्यक्षपद शिवसेनेकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून ममता मोरे यांच्या नावावर नगराध्यक्ष म्हणून एक मताने शिक्कामोर्तब करण्यात आले तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक खालीद रखांगे यांना उपनगराध्यक्ष पदी विराजमान होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दापोलीत अनिल परब आणि उदय सामंतांचा करिश्मा दापोली नगरपंचायत निवडणुकीत रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री अनिल परब यांच्या गटाची सरशी झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या वादात दापोली नगरपंचायत अतिशय अटीतटीची बनली होती. या नगरपंचायतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब विरुद्ध माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची या निवडणुकीत ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली होती, दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती त्यामुळे या नगरपंचायतीचे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पणनिकालातून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांना स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना धोबीपछाड केले आहे. दापोली नगरपंचायतीचा निकाल दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले असून 17 पैकी 14 ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. भाजपला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला तर शिवसेना बंडखोर रामदास कदम समर्थकांना केवळ दोन जागा मिळवता आल्या.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Anil parab, Ramdas kadam, Ratnagiri

    पुढील बातम्या