देवदर्शनानंतर भाविकांवर काळाचा घाला, सोलापुरात एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू

देवदर्शन करून घराकडे परतणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातला आहे. रस्ते अपघातात एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 10:35 AM IST

देवदर्शनानंतर भाविकांवर काळाचा घाला, सोलापुरात एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू

सोलापूर, 27 ऑगस्ट : देवदर्शन करून घराकडे परतणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातला आहे. भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण सोलापुरातील चिंचपूर येथील रहिवासी होते. मंगळवारी (27 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद येथे ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणनिमित्त सोलापुरातलं चडचणे कुटुंबीय दक्षिण भारतात देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन केल्यानंतर ते सर्वजण सोमवारी (26 ऑगस्ट) आपल्या मूळगावी परतत होते. यादरम्यान गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद पोहोचल्यानंतर त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे चिंचपूर गावात शोककळा पसरली आहे.

(वाचा : गायक आनंद शिंदेंच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, थोडक्यात बचावले)

अपघातातील मृतांची नावं

1.संजय अशोक चडचणे

2. राणी संजय चडचणे

Loading...

3.श्रेयस संजय चडचणे

4. गौरेश हत्तरसंगे (वय 2 वर्षे)

5. भाग्यश्री भीमाशंकर आळगी

(वाचा : पंकजा Vs मेटे संघर्ष सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी पुरवला विनायक मेटेंचा हट्ट)

जखमींची नावं

- भीमाशंकर आळगी

- शिवराज संजय चडचणे

SPECIAL REPORT: राष्ट्रवादीचे 4 बडे नेते भाजपमध्ये दाखल होणार; तारीखही ठरली!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 10:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...