प्रवरानगर, 13 ऑक्टोबर : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीची चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी 'जबतक दवाई नही, तबतक ढिलाई नही' असा नवा नारा मोदींनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रवरानगर इथं पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील वाढत चालेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
'कोरोनाचा धोका अजून ठळलेला नाही तो अजूनही कायम आहे. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थितीत अजून चिंताजनक आणि जास्त आहे. त्यामुळे नियमित मास्क वापरा, नेहमी हात स्वच्छ करत राहा, आपला परिसर स्वच्छ राखा, सोशल डिस्टसिंगचे पालन करा,असं आवाहन आणि विनंती पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
The danger of Coronavirus still persists. In Maharashtra, the situation is a little more worrying. I appeal to everyone, don't be careless when it comes to wearing masks and social distancing. Remember - 'Jab tak davai nahi, tab tak dheelai nahi': PM Narendra Modi #COVID19 pic.twitter.com/BtH9yjtLN4
— ANI (@ANI) October 13, 2020
त्याचबरोबर 'अजून कोरोनावर कोणतीही लस आली नाही. त्यामुळे जोपर्यंत लस येत नाही. त्यामुळे 'जबतक दवाई नही, तबतक ढिलाई नही' असा नवा नारा मोदींनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला दिला आहे.
कोरोनाविरोधात पुकारलेली ही लढाई आपण नक्की जिंकू आणि जिंकणारच, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारच्या योजनांचीही माहिती दिली. 'शेतकरी काय पिकं घेईल, कोणती बियाणं वापरणार, आर्थिक अडचणी काय असणार, पिक विमा, यासाठी केंद्र सरकारने अडचणी दूर करण्याचा मदत केली आहे. PM किसान समान योजनेतून शेतकऱ्यांची मुक्तात करण्यात आली आहे. या योजनेतून 1 लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. यामध्ये कुणीही मध्यस्थी नाही. एवढंच नाहीतर मेगा फ्रुड पार्क, कोल्ड स्टोरेज, अनेक योजनांवर मोदी सरकारचे काम सुरू आहे' अशी माहितीही मोदींनी दिली.
'पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाण्याच्या वापराची मोठी समस्या आहे. पाणीटंचाईची मोठी समस्या महाराष्ट्रात आहे. फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेतून मोठे काम झाले आहे'असं म्हणत फडणवीस यांचं कौतुक केले आहे.
'राज्यातील अनेक भागात पाण्याची पातळी कमी झाली आहे. या भागात अटल भूजल योजनेद्वारे काम सुरू आहे. जल जीवन मिशन योजनेतून महाराष्ट्रातील जनतेला शुद्ध पाणी पुरवठा करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा लाखो लोकांना पाणी पुरवठा केला आहे' अशी माहितीही त्यांनी दिली