Home /News /maharashtra /

राज्यासाठी धोक्याची घंटा! 1574 कोरोना पॉझिटिव्ह, 110 जणांचा मृत्यू

राज्यासाठी धोक्याची घंटा! 1574 कोरोना पॉझिटिव्ह, 110 जणांचा मृत्यू

People rest at a shelter set up for migrant workers from other Indian states affected by the coronavirus lockdown in Mumbai, India, Monday, April 6, 2020. The new coronavirus causes mild or moderate symptoms for most people, but for some, especially older adults and people with existing health problems, it can cause more severe illness or death. (AP Photo/Rafiq Maqbool)

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या खूप जास्त आहे आणि वेळीच यावर नियंत्रण आणणं आवश्यक आहे

    मुंबई, 10 एप्रिल : देशभरात कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या वाढत असली तरी कोरोनाग्रस्तांची (Covid - 19) सर्वाधिक संख्या ही एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यातही मुंबई - पुण्यात (Mumbai-Pune) तर कोरोनाने कहर केला आहे. ही संख्या इतक्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1574 पर्यंत पोहोचली असून मृत्यूंचा आकडा 110 पर्यंत पोहोचला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या खूप जास्त आहे. यातही सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1008 पर्यंत पोहोचली आहे. त्यातही पुण्यात 254, कोल्हापूर 37, अकोला 34 आणि नागपूरात 26 रुग्ण आढळून आले आहेत. त्यानुसार सध्या राज्याची संख्या 1574पर्यंत पोहचली आहे. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा असून वेळीत नागरिकांनी सावध राहणं आवश्यक आहे. अन्यथा हा आकडा कैक पटीने अधिक वाढू शकतो. सगळ्यात जास्त बाधित रुग्ण मुंबई  - 1008 पुणे मंडळ 254 कोल्हापूर मंडळ 37 अकोला मंडळ 34 नागपूर मंडळ 26 जिल्हानिहाय आकडेवारी  अकोला - 3 बीएमसी -  132 बुलढाणा - 2 केडीएमसी 2 मीरा-भाईंदर 17 नागपूर 6 नाशिक 1 नवी मुंबई 1 पीसीएमसी 3 सीएमसी 38 रत्नागिरी 1 ठाणे 2 वसई-विरार 1 राज्याबाहेरील 1 इतर - एकूण 1574 संबंधित - तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित...पुणे पोलिसांच्या जनसेवेला कडक सॅल्यूट! कोरोना संशयित गर्भवतीचा 70 किमी प्रवास, मृत्यूनंतर महिला आयोगाकडून चौकशीची मागणी
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या