'दंगल'गर्ल पूजा बनसोडेची क्रीडा अधिकाऱ्यांकडून अडवणूक

'दंगल'गर्ल पूजा बनसोडेची क्रीडा अधिकाऱ्यांकडून अडवणूक

आमिर खानच्या दंगल सिनेमानं महिला कुस्तीचं नवं पर्व सुरू केलं. मुलींच्या कुस्तीसाठी आमिरनं जशी मेहनत सिनेमात घेतलीय अगदी तशीच मेहनत आपल्या दोन मुलींसाठी लातूर जिल्ह्यातल्या खेडेगावातील वडिलांनी घेतलीय.

  • Share this:

05 डिसेंबर : आमिर खानच्या दंगल सिनेमानं महिला कुस्तीचं नवं पर्व सुरू केलं. मुलींच्या कुस्तीसाठी आमिरनं जशी मेहनत सिनेमात घेतलीय अगदी तशीच मेहनत आपल्या दोन मुलींसाठी लातूर जिल्ह्यातल्या खेडेगावातील वडिलांनी घेतलीय. पण क्रीडा विभागातल्या अधिकाऱ्यांची मनमानी इथंही या मुलींच्या मार्गात अडथळा ठरलीय.

दंगल सिनेमाची आठवण करून देणारी ही दृश्यं आहेत लातूर जिल्ह्यातल्या कव्हा गावातली आणि ही तयारी आहे पूजा बनसोडेच्या कुस्तीच्या सरावाची. स्वत: कुस्तीपटू असलेल्या दयानंद बनसोडे यांनी आपल्या दोन्ही मुलींना रानातल्या काळ्या मातीतच कुस्तीचं बाळकडू पाजलं. राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या पूजानं वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला. पण लालफितशाहीचा कारभार इथंही आडवा आला. पूजा आणि तिच्यासोबत सराव करणाऱ्या मुलींसाठी क्रीडा अधिकाऱ्यांनी कोचिंगची दारं गेल्या अनेक महिन्यांपासून बंद केलीयत.

लातूरच्या क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी मात्र या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. आणि पूजाच्या वडिलांवरच त्यांनी गंभीर आरोप  केलेत.

अगदी दंगलची कथाच या ठिकाणी घडतेय. कुस्तीसारख्या खेळात मुलींचं प्रमाण हळूहळू वाढतंय. अशावेळेस त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांची अडवणूक केली जात असेल तर देशात चांगले खेळाडू घडणार तरी कसे ?

First published: December 5, 2017, 5:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading