तुम्ही या आजींचा डान्स पाहिलात का?

तुम्ही या आजींचा डान्स पाहिलात का?

त्यांचं वय ८० वर्ष आहे. फेसबुकवर त्यांच्या नातवाने टाकलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जूनमध्ये त्यांची सैराट डान्सची क्लिप व्हायरल झाली होती. या आजी नातवाबरोबर आज्जी कोरिओग्राफी पण करतात.

  • Share this:

हलिमा कुरेशी,प्रतिनिधी  

पुणे,07 डिसेंबर: गाणं सुरु होताच सुशीला आज्जी डोलायला लागतात आणि तालावर थिरकतात. सुशीला आज्जींचं वय ८० वर्ष आहे. फेसबुकवर त्यांच्या नातवाने टाकलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जूनमध्ये त्यांची सैराट डान्सची क्लिप व्हायरल झाली होती. या आजी नातवाबरोबर आज्जी कोरिओग्राफी पण करतात.

सुशीला आजींचं वय आहे फक्त ८० वर्षं. पण ज्या नजाकतीनं त्या नृत्य करतात त्याला दाद मिळतेच आहे. आजींचा नातू ३ डीटी या डान्स अकादमीत कोरिओग्राफर आहे. अकादमीच्या वार्षिक कार्यक्रमात आजींना डान्स करण्याची विनंती केली आणि आजींनी झिंगाटच्या तालावर हा असा ताल धरला. नातवानं आज्जीचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आणि नेटिझन्सने आज्जींच्या अप्रतिम डान्सला कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडला .

आज्जी मूळच्या जेजुरीच्या आहेत. लहानपणी वाघ्या मुरळीचं नृत्य त्यांनी अगदी जवळून पाहिलं होतं. लहानपणापासून नृत्य म्हणजे त्यांचा जीव की प्राण होता. भाऊबीज आणि भिंगरी या चित्रपटात त्यांनी साईड डान्सर म्हणून कामही केलं होतं. पण लग्नानंतर पती आणि सासू सासऱ्यांना नाचणं आवडायचं नाही आणि सगळं थांबलं. पण नृत्यावरचं प्रेम मात्र कायम राहिलं.

आज्जींच्या नातवाला डान्सची प्रचंड आवड आहे. नातवानं आजीच्या कलागुणांना जगासमोर आणलंय. त्यांच्या मुलाला डान्सची आवड नाही पण आईचा अभिमान आहे. सूनबाईंना देखील सासूचं भारी कौतुक आहे.

जबाबदाऱ्या पार पाडता पाडता आपल्या आवडी जोपासणं अनेकदा महिलांना जमत नाही. पण उतारवयात सुशीला आजींनी आपली आवड जपून सगळ्याच महिलांना प्रेरणा दिली आहे.

First published: December 7, 2017, 12:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading