'खईके पान बनारस वाला' वर कोविड सेंटरमध्ये तुफान डान्स, अधिकारीही वैतागले

'खईके पान बनारस वाला' वर कोविड सेंटरमध्ये तुफान डान्स, अधिकारीही वैतागले

कोरोना संशयितांच्या डान्समुळे कोरोनाच्या महामारीच्या काळात जिल्हा प्रशासनावर नामुष्कीची वेळ आली आहे.

  • Share this:

भास्कर मेहरे, प्रतिनिधी

यवतमाळ,  09 जून : यवतमाळ जिल्ह्याच्या  महागाव येथील कोविड केअर सेंटर दाखल असलेल्या संशयितांचा डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. या  डान्समुळे कोरोनाच्या महामारीच्या काळात  जिल्हा प्रशासनावर नामुष्कीची वेळ आली आहे.

महागाव तालुक्यात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यापैकी एकाच मृत्यू झाला. त्यामुळे तालुका हादरून गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी  मृतकाच्या संपर्कात आलेल्याना 50 जणांना तात्काळ  ताब्यात घेऊन कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

हेही वाचा-लेकीनं धरला प्रियकरासोबत लग्नचा हट्ट, आई-वडिलांना गर्भवती मुलीची केली हत्या

त्यात काही राजकीय आणि बड्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. या सर्वाची प्रशासनाच्या वतीने  या ठिकाणी योग्य ती काळजी घेतल्या जात आहे.

या ठिकाणी दाखल असलेल्या चार ते पाच  संशयित तरुणांनी आपल्या बंद खोलीमध्ये रात्रीच्या सुमारास "खइके पान बनारस वाला" या गाण्यावर जोरदार डान्स केला. या संशयितांनी डान्स करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे.

हेही वाचा-मजुरांवरील खटले मागे घ्या, सुप्रीम कोर्टाने दिले केंद्र सरकारला महत्त्वाचे आदेश

मात्र या डान्समुळे जिल्हा प्रशासन चांगलेच संतप्त झाले असून डान्समधील नाचणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाईची हालचाल सुरू झाल्याची माहिती आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 9, 2020, 12:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या