एकनाथ खडसे यांच्याविरोधात एफआयआर दाखल

एकनाथ खडसे यांच्याविरोधात एफआयआर दाखल

माजी महसूल मंत्री यांच्याविरोधात अखेर तक्रारदार अंजली दमानिया यांच्या मागणीवरून वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. खडसे यांनी त्यांच्या वाढदिवशी भाषण करताना माझ्याविरोधात टीका करताना अश्लील हावभाव करून मानहानीकारक अपशब्द वापरले होते. असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय.

  • Share this:

मुंबई, 7 सप्टेंबर : माजी महसूल मंत्री यांच्याविरोधात अखेर तक्रारदार अंजली दमानिया यांच्या मागणीवरून वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. खडसे यांनी त्यांच्या वाढदिवशी भाषण करताना माझ्याविरोधात टीका करताना अश्लील हावभाव करून मानहानीकारक अपशब्द वापरले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करावी, यासाठी अंजली दमानिया यांनी वाकोला पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही केलं होतं. त्यानंतर आज अखेर खडसे यांच्या विरोधात पोलिसांनी भा.द.वि. 509 कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

एकनाथ खडसे यांनी त्यांच्या वाढदिवशीच्या भाषणात माझ्यावर टीका करताना अतिशय खालच्या पातळीची भाषा वापरली, माझ्या मनात लाज उत्पन्न होईल, असं त्यांचं वक्तव्य होतं. त्यामुळे खडसे यांच्याविरोधात तात्काळ विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी पोलिसांकडे लावून धरली होती. त्यानंतर अखेर खडसेंविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2017 07:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading