मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पिकांसह जमीनच गेली वाहून, बीडमध्ये तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास

पिकांसह जमीनच गेली वाहून, बीडमध्ये तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास

आधीच शेतीसाठी कर्ज घेतलेले, घरातला कर्ता मोठा असल्याने कर्ज फेडायचे कुठून? कुटुंब चालवायचं कसं या आर्थिक विवंचनेतून अशोक मतेने हे टोकाचे पाऊल उचलले.

बीड, 09 ऑक्टोबर : मराठवाड्यात अतिवृष्टी (marathwada rain) झाल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. 1 महिना उलटूनही अद्याप मदत मिळाली नाही म्हणून शेतकरी आता टोकाचं पाऊल उचलत आहे.  बीड (beed) तालुक्यातील नाथापूरजवळ असलेल्या शहाजानपूरमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांसह माती देखील वाहून गेली न भरून येणारे नुकसान झाले आता  कर्ज फेडायचे कोठून या आर्थिक विवनचनेतून तरुण शेतकऱ्याने शेतातच गळफास (farmer commits suicide) घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक बाबासाहेब मते ( वय 40 ) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  शहाजानपूर इथं राहणाऱ्या अशोक बाबासाहेब मते या तरुण शेतकऱ्याने रात्रीच्या सुमारास शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. क्रुझवरील पार्टीत NCP नेत्याच्या मुलाचा जवळचा माणूस होता पण..., फडणवीसांचा दावा अशोकने साडे सहा वाजेच्या सुमारास घरी जेवण केले आणि तो थेट शेतात गेला. यावर्षी मुसळधार पावसामुळे शेतातलं उभं पिक पाण्याखाली गेलं. उत्पन्नाचे साधन नाही. आधीच शेतीसाठी कर्ज घेतलेले, घरातला कर्ता मोठा असल्याने कर्ज फेडायचे कुठून? कुटुंब चालवायचं कसं या आर्थिक विवंचनेतून अशोक मतेने हे टोकाचे पाऊल उचलले.  रात्री तो उशीरापर्यंत घरी आला नाही. सकाळी शोधाशोध केली असता अशोकचा मृतदेह झाडाला लटकताना दिसून आला या आत्महत्येच्या घटनेने पिंपळनेर परिसरात खळबळ उडाली आहे. सातवीच्या विद्यार्थीनीवर शाळेतच बलात्कार; गट शिक्षणाधिकाऱ्याच्या चालकाचे कृत्य सरकारने तातडीची मदत करून शेतकऱ्याचे जीवन वाचावी अशी मागणी सामाजिक संघटना करत आहेत. अगोदरच लॉकडाऊनमध्ये आणि कोरोनाच्या संकटात अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा एकदा अतिवृष्टीने फोडणी घाला आहे. यातच आर्थिक विवंचनेतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्यामुळे सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या