ठाणे, 16 ऑक्टोबर : कोरोना (corona) काळामुळे रखडलेल्या महापालिका निवडणुकीचा (Municipal elections 2021) कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. परंतु, राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी मुंब्रा (mumbra) मतदारसंघातून दलित (dalit) आणि मुस्लिम (muslim) समाजातील लोकाची नाव मतदार याद्यांमधून (voter lists) गायब होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून यामध्ये त्यांनी मुंब्य्रातील मतदान याद्यांमध्ये घोळ होत असल्याबद्दल गंभीर आरोप केला आहे. आव्हाड यांनी थेट ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यावर आरोप केला आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ'मधील या प्रसिद्ध अभिनेत्याची मालिकेतून एक्झिट
हे असं लक्षात आलं आहे की, मुंब्राच नाही तर महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये घोळ करण्यात आला आहे. माझ्या मतदारसंघात २० ते ४० हजार नाव वगळण्यात आली आहे. नाव वगळत असताना त्यावर मतदार यांनी स्थान बदलले असा शेरा लिहिण्यात आला आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.
मतदार याद्यांचं काम हे जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली केले जात असते. मी जेव्हा मतदार याद्यांचा घोळाबद्दल विचारणा करण्यासाठी गेलो तेव्हा ज्यांची नाव मतदार यादीत होती ती लोक तिथेच राहत होती, मग नाव बदलली कुणी? मतदान याद्याची काम करणारी लोक तिथे जातच नाही, असंही आव्हाड म्हणाले.
शाळेतील परीक्षा असो वा स्पर्धा परीक्षा; ही ट्रिक वापरुन सोडवा गणितं
'जी नावं गहाळ झाली आहे, त्याला जिल्हाधिकारी जबाबदार आहे. यात प्रामुख्याने मुस्लिम आणि दलित समाजातील मतदारांची नाव जास्त वगळण्यात आली आहे. त्यामुळे मतदान ओळखपत्रासाठी आधारकार्ड हे अनिवार्य करावे. आज आधार कार्ड हे सर्वच ठिकाणी बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आधारकार्ड हे मतदान ओळखपत्रासाठी बंधनकारक करावे, अशी मागणीही आव्हाड यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: जितेंद्र आव्हाड, दलित, मुस्लिम