पंढरपुरात पडसाद! मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दलित समाजाचा ठिय्या

पंढरपुरात पडसाद! मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दलित समाजाचा ठिय्या

पिंपरी-चिंचवडमध्ये विराज विलास जगताप या 20 वर्षीय तरुणाची 8 जून सहा जणांनी मिळून हत्या केली होती.

  • Share this:

पंढरपूर, 17 जून: पुणे येथील पिंपळे-सौदागर येथील विराज जगताप खून प्रकरणाचे पडसाद बुधवारी पंढरपुरात उमटले.  मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रामभाऊ गायकवाड यांना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता दलित समाज आक्रमक झाला आहे.

हेही वाचा.. पुण्यात मोठा गोंधळ! तब्बत तीन महिन्यांनी झालेली महापालिकेची सभा तहकूब

मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी फेसबुक लाईव्ह माध्यमातून दलित समाजाबद्दल अक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यावरून आता दलित समाज बांधव आक्रमक झाले आहेत. रामभाऊ गायकवाढ यांना अटक करण्यासाठी दलित समाज बुधवारी रस्त्यावर उतरला. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दलित समाजातील नेते आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. यामुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या आश्वासनानंतर तणाव निवळला आहे.

दुसरीकडे, पिंपरी-चिंचवडमध्ये विराज विलास जगताप या 20 वर्षीय तरुणाची 8 जून सहा जणांनी मिळून हत्या केली होती. या प्रकरणी सर्व आरोपी जेरबंद आहेत. परंतु, समाजात तेढ निर्माण करणारे काही मेसेज, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसारित केले जात असल्याचे निदर्शास येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

या पार्श्वभूमीवर जातीय तेढ निर्माण होईल असे मेसेज, व्हिडिओ हे टिकटॉक, फेसबूक, इंन्स्टग्राम, टेलिग्राम, ट्विटरवर प्रसारित करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. सायबर सेल सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा... अबब... शेतकऱ्याच्या शेतात एवढा गांजा पाहून पोलिसही चक्रावले

जातीय तेढ निर्माण होईल असे मेसेज, व्हिडिओ हे टिकटॉक, फेसबूक, इंन्स्टग्राम, टेलिग्राम, ट्विटरवर प्रसारित असे केल्याचं आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

First published: June 17, 2020, 6:15 PM IST

ताज्या बातम्या