सांगली, 10 एप्रिल- सांगली आणि हातकणंगले मतदार संघात दलित महासंघाने स्वाभिमानी पक्षाला पाठिंबा दर्शविला आहे. सांगलीमध्ये विशाल पाटील आणि हातकणंगले मतदार संघात राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला आहे. संविधानाविरोधात असलेल्या भाजप सरकारला खाली खेचण्यासाठी हा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांवर दादागिरी केली आहे. भाजप यांचा कारभार फसवेगिरी आहे. दलितांच्या विरोधात त्यांची धोरणे आहेत. गेल्या 70 वर्षात जितक्या थापा कोणी मारल्या नाहीत, तितक्या थापा त्यांनी मारल्या आहेत. संविधानाला पायदळी तुडवण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले नाही. दलितांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने स्वाभिमानी पक्षाला पाठिंबा दिल्याचे मच्छिंद्र संकटे यांनी सांगितले.
दलित महासंघाची भूमिका 'मोदी हटाव' ही आहे. या भूमिकेत वंचित बहुजन आघाडी सामील झाली नाही, हे दुर्देवी आहे. पुन्हा मोदी सरकार आले तर या देशात पुन्हा निवडणूक होणार नाही. शिवाय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर बसण्यास लायक नाहीत, असा घणाघात दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र संकटे यांनी केला आहे.
VIDEO: रामदास आठवलेंनी वर्तवलं पवारांच्या बालेकिल्ल्याचं भाकीत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dalit Mahasangh, Hatkangale, Macchindra Sankate, PM narendra modi, Raju sheety, Raju Shetti, Sangli, Sangli S13p44