• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Corona Updates : राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या 8 हजारांवर, पश्चिम महाराष्ट्रात उद्रेक कायम

Corona Updates : राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या 8 हजारांवर, पश्चिम महाराष्ट्रात उद्रेक कायम

महाराष्ट्रात दैनंदिन आढळणाऱ्या नव्या कोरोना रुगणांची संख्या ही अजूनही 8 हजारांच्या वर नोंदवली जात असून पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक कमी होत नसल्याचा हा परिणाम असल्याचं स्पष्ट होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 11 जुलै : देशातील आणि महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट (Second wave) ओसरत असल्याचं चित्र असलं तरी ही लाट पूर्णतः ओसरायला अद्याप प्रतिक्षा करावी लागेल, असं जाहीर झालेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे. महाराष्ट्रात दैनंदिन आढळणाऱ्या नव्या कोरोना रुगणांची (New covid patients) संख्या ही अजूनही 8 हजारांच्या वर (Above 8 thousand) नोंदवली जात असून पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) कोरोनाचा उद्रेक कमी होत नसल्याचा हा परिणाम असल्याचं स्पष्ट होत आहे. जाहीर आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8535 नवे रुग्ण आढळले असून 6013 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 156 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्याचा मृत्युदर 2.04 टक्के एवढा नोंदवला गेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण मात्र सुधारत असून राज्याचा रिकव्हरी रेट हा 96.02 टक्के एवढा नोंदवला गेला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४०,१०,५५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,५७,७९९ (१३.९९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,९६,२७९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,७७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर एकूण १,१६,१६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. हे वाचा -महिलेला एकाच वेळी कोरोनाच्या 2 व्हेरिएंटची लागण; 5 दिवसात जे घडलं त्यानं... पश्चिम महाराष्ट्रात गंभीर स्थिती राज्यातील बहुतांश भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी पश्चिम महाराष्ट्रात मात्र कोरोनानं धुमाकूळ घातल्याचं चित्र आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोल्हापूरमध्ये 1193, साताऱ्यात 755 तर सांगलीत 927 नव्या कोरोना रुग्णांची नोंद गेल्या 24 तासांत झाली आहे.
  Published by:desk news
  First published: