मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dahi Handi 2022 : दहीहंडीचं भाषण सुरू असतानाच पाऊस आला, छत्री येताच फडणवीसांनी काय केलं? पाहा VIDEO

Dahi Handi 2022 : दहीहंडीचं भाषण सुरू असतानाच पाऊस आला, छत्री येताच फडणवीसांनी काय केलं? पाहा VIDEO

मुंबईमध्ये दहीहंडी (Dahi Handi Celebration) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबई, ठाणे आणि कल्याण परिसरातल्या वेगवेगळ्या दहीहंडींमध्ये सहभाग नोंदवला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
भिवंडी, 19 ऑगस्ट : मुंबईमध्ये दहीहंडी (Dahi Handi Celebration) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दोन वर्ष कोरोनामुळे उत्सव साजरा करता न आल्यामुळे यावेळी गोविंदा पथकांमध्ये चांगलाच जोश होता. त्यातच महापालिका निवडणुका तोंडावर असल्यामुळे राजकीय पक्षांनीही जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबई, ठाणे आणि कल्याण परिसरातल्या वेगवेगळ्या दहीहंडींमध्ये सहभाग नोंदवला. भिवंडीमध्ये भाजप खासदार आणि राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या दहीहंडीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असताना अचानक पावसाला सुरूवात झाली. पाऊस सुरू झाल्यानंतर फडणवीस यांच्यासाठी मागून एकाने छत्री पकडली, यानंतर फडणवीस यांनी मला छत्री नको, इकडे एकच छत्रपती आहेत, असं म्हणत समोरच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दाखवला. 'आता सर्व खुले खुले वाटत आहे, कारण आपले सरकार आल्यानंतर दहीहंडी व गणेशोत्सव यावरील सर्व निर्बंध दूर झाले आहेत. याच प्रमाणे नवरात्री उत्सवही उत्साहात साजरा केला जाणार आहे', असं फडणवीस म्हणाले. दरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईमधल्या दहीहंडीच्या कार्यक्रमांनाही हजेरी लावली. आम्ही मुंबई महापालिकेतली भ्रष्टाचाराची हंडी फोडणार असल्याचं आव्हान फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं. तसंच हंडी फुटल्यावर जसा दही काला सगळ्यांमध्ये वाटून खाल्ला जातो, तशीच विकासाची हंडी आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवू, असं आश्वासन फडणवीस यांनी जनतेला दिलं. 'दीड महिन्यापूर्वी 50 थर लावून मोठी हंडी फोडली', मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
First published:

Tags: Devendra Fadnavis

पुढील बातम्या