28 एप्रिल : शुक्रवारी सकाळपर्यंत नाशिकच्या एकलहरे परिसरात राहणाऱ्या गोधडे यांच्या कुटुंबात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं आणि आता तिथं स्मशानशांतता पसरलीय. कारण लग्नासाठी पाहुणी म्हणून आलेल्या 14 वर्षीय मुलीनं पाचव्या मजल्यावरून उडी मारली.
मुलीनं उडी मारल्याचं समजताच तिचे वडील तिला झेलण्यासाठी धावले. मात्र ती मुलगी वडिलांच्या अंगावर कोसळली आणि त्यात वडिलांचा मृत्यू झाला. विजय गोधडे असं मृत्यू पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर उडी मारणारी सुनंदा गभीर जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. डिजेच्या आवाजावरून सुरू झालेल्या वादाचा असा अंत होईल याची कुणी कल्पनाही केली नव्हती.
रागाच्या भरात पाचव्या मजल्यावरुन उडी मारणाऱ्या मुलीला वाचवण्यात वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक मध्ये घडले आहे. लग्न समारंभादरम्यान घडलेल्या या घटनेने परिवारात हळहळ व्यक्त होतेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.