एकाच साच्यातून चार रिव्हॉल्वर ?, चार जणांचा खून

एकाच साच्यातून चार रिव्हॉल्वर ?, चार जणांचा खून

दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचा खून करण्यात आलेली रिव्हॉल्वर एकाच साच्यातून (डायमधून) बनवलेल्या ४ वेगवेगळ्या रिव्हॉल्वरने चौघांच्या हत्या करण्यात आली आहे का? या दिशेनं आता सीबीआयने तपास सुरू केलाय.

  • Share this:

मुंबई, 19 आॅगस्ट : डाॅ.नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी सचिन अंदुरे या मारेकऱ्याला अटक करण्यात आली. त्याने खुनाची कुबलीही दिली. या अटकेमुळे अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या कटाचा पर्दाफाश झाल्याने डाॅक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांची हत्या एकाच रिव्हॉल्वरने केली आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचा खून करण्यात आलेली रिव्हॉल्वर एकाच साच्यातून (डायमधून) बनवलेल्या ४ वेगवेगळ्या रिव्हॉल्वरने चौघांच्या हत्या करण्यात आली आहे का? या दिशेनं आता सीबीआयने तपास सुरू केलाय.

या करता वैभव राऊतच्या नालासोपारा येथील घर आणि दुकानातून मिळालेले १० पिस्टल बॅरल, ६ अर्धवट तयार केलेल्या पिस्टल बाॅडी, ३ अर्धवट मॅग्झीन, ७ अर्धवट पिस्टल स्लाईड, १६ रिले विथ स्मिथ तसंच सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरातून मिळालेले स्फोटकं आणि बंदूक बनवायचे पुस्तके हे सर्व साहित्य फाॅरेन्सिक प्रयोग शाळेत तपासणी करता पाठवण्यात आले आहे.

सीबीआयला संशय आहे की, याच टीम कडून पुरवलेल्या हत्यारांनी डाॅक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांची हत्या करण्यात आलीये. त्यानुसार सीबीआय देखील आता तपास करत आहे.

दरम्यान, डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास अखेर पूर्ण झालाय. नालासोपारा येथे स्फोटकांसह तिघांना अटक केली आणि नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा देखील उलगडा झाला. औरंगाबादेत सचिन अंदुरेला अटक करण्यात आली. अंदुरेच्या चौकशीतून नवीन धक्कादायक माहिती समोर आलीये. दाभोलकर यांच्यावर हल्लेखोरांनी बाईकवरून गोळीबार केला नसल्याची माहिती समोर आलीये.

20 आॅगस्ट 2013 रोजी अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर  हे सकाळी सात वाजेच्या सुमारास माॅर्निंग वाॅकसाठी गेले होते.  पुण्यामध्ये ओंकारेश्वर पुलावर पोहोचले असता तिथे दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून खून केला. त्यानंतर तिथून ते पसार झाले. सचिन अंदुरेच्या चौकशीतून नवीन माहिती समोर आली. ज्या दिवशी दाभोलकरांवर गोळीबार झाला त्या दिवशी सचिन अंदुरे हा दुसऱ्या दुचाकीवरून पसार झाला होता. जे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले होते. त्यात सचिन अंदुरे आणि त्याचा साथीदार दोघे ही मोटारसायकल वरून आले नाही. सचिन आणि त्याचा सहकारी दोघेही ओंकारेश्वर पुलावरच उभे होते. दाभोलकर समोरून येत असता दोघांनी त्यांच्याजवळ जाऊन गोळ्या झाडल्यात.  या दोघांनी दाभोळकरांवर दोन दोन राउंड फायर केले. या दोघांकडे एकूण 3 रिव्हॉल्व्हर होत्या अशी माहिती समोर आलीये.

FBवरून वाजपेयींवर टीका करणाऱ्या प्राध्यापकाला बेदम मारहाण, VIDEO VIRAL

First published: August 19, 2018, 12:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading