वैभव सोनवणे,प्रतिनिधी
पुणे, 14 डिसेंबर : : डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात सीबीआयचा हलगर्जीपणा आणि वेळकाढूपणा चांगलाच महागात पडला आहे. आरोपी अमोल काळे, अमित डेगवेकर आणि राजेश बांगेरा यांना जामीन मंजूर झाला आहे.
पुणे कोर्टानं या तीन आरोपींना जामीन दिला आहे. 90 दिवसांत आरोपपत्र दाखल करायचं असतं, पण सीबीआयला तेही करणं जमलेलं नाही. अमोल काळे, अमित देगवेकर आणि राजेश बांगेरा यांच्यावर यूएपीए लावला. त्यामुळे सीबीआयने आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मागणं अपेक्षित होतं पण ती मागितली नाही आणि 90 दिवस अटकेला उलटून गेल्यामुळे डिफॉल्ट बेल मिळाला आहे.
हे तिन्ही आरोपींची गौरी लंकेश हत्येप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. याचा ताबा कर्नाटक एटीएसकडे होता. दाभोलकर खून प्रकरणात या तिघांची चौकशी करण्यात आली. या तिघांचा कर्नाटक पोलिसांकडे ताबा आहे. परंतु, सीबीआयकडे पुढील 90 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करणे गरजेचं होतं. पण तसा सीबीआयकडून कोणताही प्रयत्न झाला नाही त्यामुळे या तिघांना दाभोलकर प्रकरणात जामीन मिळाला.
या तिघांना जामीन जरी मिळाला असला तरी गौरी लंकेश हत्या प्रकरणात या तिघांचाही ताबा कर्नाटक पोलिसांकडे असणार आहे.
===============