BREAKING: रायगडमध्ये कंपनीत भीषण स्फोट, 18 जखमी तर 5 जण गंभीर भाजले

BREAKING: रायगडमध्ये कंपनीत भीषण स्फोट, 18 जखमी तर 5 जण गंभीर भाजले

यातील 5 जण गंभीर भाजले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जखमींना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  • Share this:

रायगड, 15 नोव्हेंबर : रायगड माणगाव तालुक्यातील विळभगाड औद्योगिकीक क्षेत्रातील क्रीपझो प्रा. लि. कंपनीत सिलेंडरचा मोठा स्फोट झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. 4:30 च्या सुमारास सिलेंडर चा स्फोट होऊन यामध्ये 18 जण भाजून जखमी झाले आहेत. यातील 5 जण गंभीर भाजले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जखमींना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये असलेल्या सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी तेव्हा मोठा आवाज आला. या आवाजामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कंपनीत मोठा स्फोट झाल्याचं समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

इतर बातम्या - 'तेरे मिलने को न आएंगे सनम' जितेंद्र आव्हाडांनी गायलं राऊतांच्या मनातलं गाणं

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर आता उपचार सुरू असून जखमींमधील 5 जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलीस सध्या या सगळ्या प्रकरणाचा तपास घेत असून बचावकार्य अद्याप सुरू आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 15, 2019, 6:34 PM IST

ताज्या बातम्या