Home /News /maharashtra /

अकोल्यात सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना; 1 जागाची ठार, लहान मुलं जखमी

अकोल्यात सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना; 1 जागाची ठार, लहान मुलं जखमी

हवेतील गॅस फुगे फुगवणाऱ्या सिलिंडरचा स्फोट झाला आहे.

अकोला, 14 ऑक्टोबर : अकोलाच्या जुने शहरातील गोंडपुरा भागातील प्रमोद किराणा दुकानाच्या जवळ असलेल्या गल्लीत हवेतील गॅस फुगे फुगवणाऱ्या सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत दाभाडे नामक एक व्यक्ती ठार झाला आहे. सिलिंडरच्या स्फोटात दोन जण गंभीर जखमीही झाले आहे. जखमींमध्ये एका लहान मुलांचा समावेश आहे. जखमींवर उपचारासाठी शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या गाडीवर गॅस सिलेंडर ठेवले होते त्या दुचाकीचा मागचा भाग जळाला. या सिलेंडरचा स्फोट कशाने झाला याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, शहरात सिलिंडर स्फोटाची घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही घाबरण्याचे कारण नाही, असं आवाहन करण्यात आलं आहे. (ही बातमी अपडेट होत आहे)
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Akola

पुढील बातम्या