• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates : देशातील GST फसवणुकीची सर्वात मोठी घटना, शासनाची 84 कोटींची फसवणूक

Live Updates : देशातील GST फसवणुकीची सर्वात मोठी घटना, शासनाची 84 कोटींची फसवणूक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 03, 2022, 21:29 IST
  LAST UPDATED 5 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:44 (IST)


  ऑपरेशन गंगा'अंतर्गत आणखी एक विमान झेपावलं
  पोलंडहून 219 विद्यार्थ्यांना घेऊन विमान निघालं
  व्ही.के. सिंगांच्या नेतृत्वात विमान भारताच्या दिशेनं

  20:43 (IST)

  युक्रेन आणि रशियात पुन्हा चर्चेची फेरी
  पोलंड-बेलारुस सीमेवर महत्त्वाची चर्चा
  दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात बैठक सुरू
  चर्चेतून युद्धावर तोडगा निघणार का?

  20:39 (IST)

  युक्रेनमधल्या विद्यार्थ्यांसाठी नव्या सूचना
  'बंकरमध्येच राहा, बाहेर पडणं टाळा'
  'सोशल मीडियाचा वापर शक्यतो टाळा'
  घाबरून जाऊ नका - संरक्षण मंत्रालय

  20:34 (IST)

  सुधीर मुनगंटीवारांची राज्य सरकारवर टीका, म्हणाले...

  - अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या भूमिका, प्रश्न, आपआपल्या विधानसभातल्या प्रश्नांचा विचार करतो 
  - इतर सर्व अधिवेशनापासून हे अधिवेशन वेगळं आहे 
  - कोरोनामुळे मोठं संकट आहे, त्यामुळे सरकारनं दिलासा द्यावा
  - अर्थसंकल्पात सामान्यांसाठी दिलासा असावा 
  - अर्थसंकल्पात काही कमी असेल तर आम्ही तुटून पडू 
  - राज्यात भ्रष्टाचार आहे, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत
  - गोगल गायींनी देखील आत्महत्या करावी एवढ्या हळूवार फाईलींचा निपटारा होतोय 
  - तेराशे कोटी शेतकऱ्यांना देणे 
  - पिओ वाईन रहो फाईन असं सरकारचं धोरण आहे 
  - सरकार तर्कहिन उत्तरं देतंय
  - ओबीसींचे प्रश्न आहेत

  20:13 (IST)

  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उद्या चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. मात्र उद्या बारावीच्या परीक्षेचा पहिला दिवस असल्याने 11 नंतरच हे आंदोलन करण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे. आंदोलना दरम्यान परीक्षार्थींना कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. उद्या राज्यभर दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन होत आहे

  20:5 (IST)

  खारकिव्हमधील भारतीयांसाठी दूतावासाच्या सूचना
  ट्विटरवर फॉर्म जारी, तपशील भरण्याच्या सूचना

  19:38 (IST)

  युद्धजन्य परिस्थितीमुळे जळगाव बाजारपेठेतील खाद्य तेलाच्या भावात वाढ

  रशिया व युक्रेन युद्धाचा परिणाम खाद्यतेलाच्या दरवाढीवर झाला आहे. गेल्या दहा दिवसांत सोयाबीन व सूर्यफूल तेलाचे भाव प्रतिकिलो 25 ते 30 रुपयांनी वाढले आहेत. तर प्रति 15 किलो तेलाच्या डब्यामागे 400 रुपयांची वाढ झाली आहे. आयातीवर परिणाम झाल्याने खाद्यतेलात भाववाढ झाल्याचे पाहायला मिळत असून गृहीणींचे बजेट कोलमडले आहेत.

  19:35 (IST)

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वन अधिकाऱ्यांवर संतापले, काम न करणाऱ्या वन अधिकाऱ्यांचे CR खराब करणार, गडकरींचा इशारा

  19:10 (IST)

  खारकिव्हमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी
  विद्यार्थ्यांसाठी दूतावासाची विशेष मोहीम

  19:9 (IST)

  युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परतणार
  'ऑपरेशन गंगा' मोहिमेंतर्गत अनेक उड्डाणं तैनात
  दोन डझनहून अधिक मंत्री सहभागी होणार
  10 मार्चपर्यंत मिशनमध्ये 80 उड्डाणं समाविष्ट होणार
  ऑपरेशन गंगामध्ये एअर इंडिया,एअर इंडिया एक्स्प्रेस?

  ऑपरेशन गंगामध्ये इंडिगो, स्पाईस जेट, विस्तारा?
  ऑपरेशन गंगामध्ये गो एअर, हवाई दलाची विमानं?

  नवाब मलिक यांना ७ मार्च पर्यंत इडी कोठडीकोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स