मुंबई, 13 डिसेंबर : मागच्या चार दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तामीळ नाडू, आंध्रप्रदेशच्या किनारपट्ट्यांवर जोरदार पाऊस होत आहे. दरम्यान झालेल्या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होत आहे. चक्रीवादळाचा परिणामामुळे राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
दरम्यान पुढचे दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा उत्तर केरळ ते मध्यपूर्व अरबी समुद्रापर्यंत चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्याचा प्रभाव कायम असतानाच 13 डिसेंबर रोv g
Latest satellite obs at 7.30 am of 13 Dec: Strengthening of CYCIR over SE and East Central Arabian sea off the coast of N Kerala and adj Karnataka.#Mumbai #Thane looks partly cloudy too. pic.twitter.com/RxdgE0nl6L
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 13, 2022
हे ही वाचा : पाऊस, ऊन आणि वादळ सर्वात आधी तुम्हाला मिळेल अलर्ट; असे व्हा हवामान शास्त्रज्ञ
उत्तर केरळ ते मध्य पूर्व अरबी समुद्रापर्यंत तयार झालेली चक्रीय स्थिती तसेच 13 डिसेंबरला किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या दोन्ही स्थितीमुळे राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड या भागांत हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जाहीर केला असून मंगळवारी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या दोन्ही स्थितीच्या प्रभावामुळे कोकणातील सिधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड या भागात ’यलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मात्र, बुधवारपासून पाऊस कमी होणार आहे. तुरळक ठिकाणीच पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हे ही वाचा : थंडी वाढली, खराब हवामानामुळे मुंबईसह दिल्लीकरांना फटका, श्वसनाच्या त्रासात वाढ
रब्बी पिकांना बसणार फटका?
चालू आर्थिक वर्षात पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला अनेक भागात पाऊसच झाला नाही, त्यामुळे पेरणीला विलंब झाला. पेरणी झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा विदर्भ आणि मराठवाड्याला बसला. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं. त्यानंतर ऐन हातातोंडाशी घास आला असताना पुन्हा अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आता अवकाळी पाऊस झाल्यास याचा मोठा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyclone, Weather, Weather forecast, Weather update